Mumbai Local Train : लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मोटरमनच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी इतर मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या (Mumbai Central Railway) मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आज शनिवारी त्रास सहन करावा लागला. सीएसएमटी स्थानकात (Mumbai CSMT Local) प्रवासी अडकून पडले होते. मोटरमनच्या केबिनसमोर प्रवाशांनी गर्दी केली होती. मोटरमन उपलब्ध नसल्यामुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 84 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक प्रवाशांना लवकर घरी पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
दुपारी अडीच वाजता हा गोंधळ सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री आणखी लोकल रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकल रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी दिसून आली. आरपीएफ प्रवाशांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करत होते. गाडीची घोषणा करावी. ट्रेन उशीर झाली हे कोण सांगणार? असा सवाल प्रवासी करत आहेत. आम्ही अर्धा तास स्टेशनमध्ये उभे आहोत. घरी जायचं आहे, कोणाला सांगायचे? असा संताप प्रवाशांमध्ये उमटत आहे.
‘आम्हाला कढीपत्ता समजल्या जायचं’, राष्ट्रवादीत प्रवेश करताच सिद्दीकींचा पहिला वार
केबिनमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी आम्हाला गाड्या पार्क केल्या आहेत, आता घरी जा, असे उत्तर दिले. ते आमच्यावर उपकार करतात का? त्यांना काही अक्कल आहे का, ते फुकट काम करतात का? असा संतप्त सवाल नागरिक करत होते. गेल्या एक तासापासून आम्ही इथे उभे आहोत आणि वाट पाहत आहोत. आम्हाला घर नाही का? अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून येत आहेत.
हे फर्मांन अजित पवारांच्या बोलण्यासारखे : राज ठाकरे यांची फटकेबाजी
धोकादायक पद्धतीने रेल्वे सिग्नल ओलांडल्याप्रकरणी मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत होती. काल शुक्रवारी सँडहर्स्ट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला. शर्मा यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
मात्र, नातेवाईक उशीरा आल्याने सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्य आणि हार्बर मार्गावरील शेकडो मोटारमनने शर्मा यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत अतिरिक्त काम करण्यास नकार दिला.
Paytm Crisis: विजय शेखर शर्मा! अब्जाधीश ते दिवाळखोरपर्यंतचा प्रवास