Mumbai News : महायुतीत माहीम मतदारसंघावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना तिकीट दिलं आहे. भाजपने अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने येथे थेट सदा सरवणकर यांना मैदानात उतरवलं आहे. आता लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेऊन या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार मागे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत चर्चा सुरू असतानाच मोठी बातमी हाती आली आहे. महायुतीने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याची माहिती आहे.
चिन्ह कष्टानं कमावलेलं, ढापून मिळवलेलं नाही, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
माहीम मतदारसंघात मनसेने यंदा राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना मैदानात उतरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तेव्हा विधानसभा निवडणुकीत मनसेला मदत करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसं बोलूनही दाखवलं आहे.
त्यानंतर एकनाथ शिंदेंनी सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. या मतदारसंघाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. याआधी सदा सरवणकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यांनी वरिष्ठ नेत्यांची ऑफर स्वीकारली नाही.
यानंतर महायुतीने शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांना एक खास ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे. सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतल्यास त्यांना विधानपरिषदेची संधी मिळणार आहे. मात्र या ऑफरवर सदा सरवणकर यांचा काय प्रतिसाद राहिला याची माहिती मिळालेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात सदा सरवरणकर काय निर्णय घेतात. खरंच उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ शिंदे मात्र..काय म्हणाले फडणवीस?
माहिम मतदारसंघातून मनसेने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाने सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. मात्र भाजपन या मतदारसंघात अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका स्वीकारली आहे. एकनाथ शिंदे यांनीही आपला उमेदवार मागे घेऊन अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आम्ही सर्व चर्चा करत आहोत. आम्ही सर्व एकत्र असून यावर मार्ग काढला जात आहे. आज आमची बैठक होणार आहे.