Narayan Rane on Raj Uddhav Alliance : राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र (Uddhav Thackeray) येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या चर्चांनी वेग घेतला आहे. राज ठाकरेंनी एका (Raj Thackeray) मुलाखतीत युतीचे संकेत दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही टाळी दिली होती. आता या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांनीही (Narayan Rane) या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. कुणाच्या सोबत जा. पूर आल्यावर पुराच्या पाण्यात सगळेच वाहून जातात. भाजपाचा पूर आलाय. त्यात ते टिकणार नाहीत असे नारायण राणे म्हणाले आहेत.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. खासदार संजय राऊत यांनाही चांगलंच फटकारलं. शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य केलं राणे म्हणाले, कुणाच्याही सोबत जा. पूर आल्यावर पुराच्या पाण्यात सगळेच वाहून जातात. भाजपाचा पूर आलाय. त्यात हे टिकणार नाही. हा पूर जाचक नाही. लोकांना त्रास होणार नाही. उलट फायदाच होईल. आमची दोन्ही ठिकाणी सत्ता आहे. केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत आहे.
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, राजवट अन् पाऊस.. तरी मुंबई बुडाली नव्हती, नारायण राणेंची तुफान फटकेबाजी
ह्यांच्याकडे निवडणुकीत सांगायला काय आहे? 26 वर्षांच्या भ्रष्टाचारावर बोलणार की कोरोना काळातील भ्रष्टाचारवर बोलणार असा खोचक सवाल नारायण राणे यांनी विचारला.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याने काहीही चमत्कार घडणार नाही. काय होणार चमत्कार? अशी काय जादू आहे ह्यांच्याकडे? दोघांचा हिशोब करा ना. ह्यांनी आतापर्यंत मराठी माणसांचं काय कल्याण केलं? पूर्वी मुंबईत 60 टक्के मराठी माणसं होती. आज फक्त 16 टक्के राहिली आहेत. शिवसेनेनं काय केलं? हिंदू हिंदू. आता सावरकर सावरकर. ज्यावेळी राहुल गांधी सावरकरांवर टीका करायचे त्यावेळी मुख्यमंत्री होता. राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसायचे. तेव्हा काही बोलला नाहीत. आता मात्र हेच उद्धव ठाकरे सावरकर सावरकर करत आहेत अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली.
राज आणि उद्धव हा फॉर्म्युला असेल तर दोघांनाही पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा. दोन्ही भाऊ एकत्र आले तर विजय मिळेल. काय समीकरण आहे माहिती नाही. एकाकडे शून्य आमदार तर दुसऱ्याकडे 20 आमदार. दोघांची बेरीज करा किती होतात पाहा. त्यामुळे काहीच फरक पडणार नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काही चालणार नाही, असाही टोला खासदार नारायण राणे यांनी लगावला.
पालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्राचा मास्टरस्ट्रोक; राज ठाकरेंच्या शिलेदाराची मागणी झटक्यात मान्य