पाहिले युतीच्या बाता अन् आता हात आखडता; एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांचे घूमजाव

पाहिले युतीच्या बाता अन् आता हात आखडता; एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांचे घूमजाव

Raj Thackeray’s hesitation about coming together with Udhhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना युतीसाठीचा प्रस्ताव ठेवला होता. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनीही भूमिका मांडली होती. त्यावर आता कित्येक दिवसांनतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र त्यांनी आपल्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यावर घुमजाव केले आहे.

भुजबळांच्या दालनात कुणाचे फोटो? पत्रकाराचा प्रश्न अन् भुजबळांचं मन जिंकणारं उत्तर

काय म्हणाले राज ठाकरे?

मुंबई तकच्या पुण्यातील जयहिंद कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये राज यांना त्यांच्या उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या त्यांच्या प्रस्तावावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मी पुर्ण मुलाखत दिली मात्र माझी दोनच वाक्य उचलली गेली. मी चर्चा केली जावी म्हणून मुद्दाम कोणताही विषय छेडत नाही. बोलण्याच्या ओघात मी बोलून जातो. त्यामुळे मी माझ्या बोलण्याचा अर्थ कसा घ्यायचा हे सांगायला पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले गेले. असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यावर घुमजाव केले आहे.

मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

काय म्हणाले होते राज ठाकरे?

आज शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर, अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असे मांजरेकर म्हणाले होते. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा असल्याचे उत्तर राज ठाकरेंनी दिले होते. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद आणि सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही.

मंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच मंत्री छगन भुजबळ साईचरणी; पाहा फोटो

परंतु, विषय फक्त इच्छेचा असून, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचापण विषय नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि तो मी पाहतोच असे राज ठाकरेंनी म्हटले होते. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असे राज यांनी मुलाखतीत म्हटले होते. मी त्यांच्याबरोबर काम करावं? ही उद्धव ठाकरेंनी इच्छा आहे का? असा प्रश्नही राज यांनी विचारला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube