Download App

Mumbai News : ऑलिम्पिक दर्जाच्या स्विमिंग पूलमध्ये चक्क मगर; कर्मचाऱ्यांची सतर्कता आली कामी

Mumbai News : मुंबईतील दादर येथील ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात (Mumbai News) मगरीचे पिल्लू आढळून आले. आज पहाटे हे पिल्लू काही जणांना तलावात दिसले. त्यानंतर हे पिल्लू (Crocodile) तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले‌ असून ते खात्याच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. याआधी या तलावाच्या परिसरात साप, अजगर आढळले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दादर परिसरात मागील वीस वर्षांपासून मुंबई महानगरापालिकेचा जलतरण तलाव (Swimming Pool) आहे. येथे पोहायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लहान मुलांपासून अगदी प्रौढांपर्यंत सगळेच येथे पोहण्यासाठी गर्दी करत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून येथे साप आढळत होते. आज तर पहाटे मगरीचे पिल्लू सापडले. या मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा घेतला.

तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी; नांदेड घटनेवरून मनसेचा ठाकरी शैलीत समाचार

जलतरण तलाव सुरू करण्याआधी (Mumbai News) नियमित तपासणी करण्यात येते. तशी ती आजही करण्यात येत होती. त्याचवेळी तलावात मगरीचे पिल्लू दिसून आले. प्राणी संग्रहालयातून हे पिल्लू येथे आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. मगरीचे पिल्लू तलावात कुठून आले, याची चौकशी करण्यात येईल व त्यानुसार आवश्यक प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

मुंबईकरांना दिलासा! CNG-PNG च्या दरात कपात, मध्यरात्रीपासून नवे दर लागू, किती दर घटले?

प्राणीसंग्रहालयावर कारवाई करा – मनसे

जलतरण तलावाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजूलाच असलेल्या प्राणी संग्रहालयातून ही मगर आली असावी असा संशय आहे. याआधी देखील साप, अजगरासारखे अनेक प्राणी त्याच प्राणी संग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांत घबराट पसरली होती. त्यामुळे या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Tags

follow us