मुंबईकरांना दिलासा! CNG-PNG च्या दरात कपात, मध्यरात्रीपासून नवे दर लागू, किती दर घटले?
Rates of CNG-PNG : मुंबईत राहायचं म्हटलं तर महागाईची (inflation) कळ सोसावी लागते. मुंबईत घरांपासून भाजीपाला ते भाजीपाल्यापर्यंत सगळचं महाग आहे. दरम्यान, महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांसाठी आऩंदाची बातमी आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुंबईत सीएनजी-पीएनजीचे दर (Rates of CNG-PNG) कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुढील 48 तास तासांत धो-धो पाऊस, IMD चा ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, कधी परतणार मान्सून?
महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात 3 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दर कपातीची माहिती दिली आहे. घरगुती वापर आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, नवीन दर लागू झाल्यानंतर मुंबईकरांना सीएनजी 76 रुपये किलो दराने मिळत आहे, तर पीएनजीची किंमत ४47 रुपये किलो आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता अनेक वाहनधारक आता सीएनजी वाहनाचा पर्याय निवडतात. सध्या मुंबईत अनेक वाहने सीएनजी-पीएनजीवर चालतात. मोठ्या संख्येने चालक सीएनजी-पीएनजी वाहनांचा वापर करतात. तर, मुंबईत काही ठिकाणी स्वयंपाकासाठी पीएनजीचाही वापर केला जातो.
एमजीएलने सांगितले की, मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवरील खर्चाच्या तुलनेत 50 टक्के आणि डिझेलवरील खर्चाच्या तुलनेत 20 टक्के बचत करत आहेत. एमजीएलने प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की, पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी आहेत. अशातच महानगर गॅस लिमिटेडने घेतलेल्या दर दरकपातीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गॅस सिलिंडरच्या दरात 204 रुपयांनी वाढ
1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 204 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर आता मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 1,684 रुपयांना विकला जाणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या.