तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी; नांदेड घटनेवरून मनसेचा ठाकरी शैलीत समाचार
मुंबई : नांदेड येथील शासकीय रूग्णालयातील मृत्युवर विरोधी पक्षांकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात असून, मनसे अध्यक्ष राज ठकारेंनी (Raj Thackeray) देखील या घटनेवरून संताप व्यक्त करत तीन पक्ष ठणठणीत, बाकी सगळे आजारी असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरेंनी राज्य सरकराचा ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे. नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. (Raj Thackeray On Nanded Civil Hospital Death Issue )
Ghati Hospital Death : धक्कादायक! नांदेडपाठोपाठ ‘घाटी’ रुग्णालयात 24 तासांत 10 मृत्यू
महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं
तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये, पण महाराष्ट्राचं काय ?दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं असा सल्लाही राज ठाकरेंनी शिंदे सरकारला दिला आहे.
नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय.…
— Raj Thackeray (@RajThackeray) October 3, 2023
औषधांच्या साठ्यावरही राज ठाकरेंचे भाष्य
राज ठाकरेंनी यावेळी राज्यातील सरकारी दवाखान्यात असलेल्या औषधांच्या साठ्यावरही भाष्य केले आहे. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय असे राज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Nanded Hospital मधील 24 रुग्णांचे मृत्यू शासन पुरस्कृत; विजय वडेट्टीवारांचे 5 गंभीर आरोप
राज्य सरकार अस्तित्वातच नाही – संजय राऊत
नांदेड घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शिंदे सरकावर हल्लाबोल करत या घटनेवरून राज्य सरकार अस्तित्त्वातच नसल्याचे राऊतांनी म्हटले आहे. नांदेड सारख्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण मृत्यू होतात, यावर सरकार अस्तित्वातच नसून ही पहिली घटना नसल्याचे सांगत या आधीदेखील ठाण्यातील कळव्याच्या पालिका रुग्णालयातदेखील असा प्रकार घडला होता असे राऊतांनी सांगितले.
Ghati Hospital Death : धक्कादायक! नांदेडपाठोपाठ ‘घाटी’ रुग्णालयात 24 तासांत 10 मृत्यू
महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. कळव्यातील प्रकरणानंतर अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की, ठाण्यामध्ये असा प्रकार कसा घडू शकतो? त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यचे टाळलं होत. मुख्यमंत्री फक्त ठाण्याचे पालक नाही ते संपूर्ण राज्याचे पालक असल्याची आठवणदेखील राऊतांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना करून दिली आहे.
Nanded Civil Hospital Death: अधिकाऱ्याच्या अट्टहासने घेतले चिमुरड्यांचे बळी?
राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असताना सरकारला फक्त जमिनीचा व्यवहार, परदेश दौरा, माणसे फोडण्यात यातच इंटरेस्ट उरलेला आहे. या गंभीर घटनांनंतर थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे. आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात इंटरेस्ट नसून वेगळ्याच कामात ते अडकलेले असतात अशी गंभीर टीका राऊतांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे नाव घेता केली आहे.