Download App

नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे.

Mumbai News : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात समीर खान जखमी झाले होते. मुंबईतील प्रसिद्ध क्रिटीकेअर रुग्णालयासमोर त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी घातली होती. यानंतर मागील काही दिवसांपासून समीर खान यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत होते, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मलिक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर  कोसळला आहे.

नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; आयसीयूमध्ये उपचार सुरू, मुलगी निलोफरही घटनेत जखमी

कसा झाला होता अपघात

समीर खान आणि त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर दोघेही बाहेर आले. यानंतर समीर यांनी ड्रायव्रला गाडी घेऊन येण्यास सांगितलं. यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान गे मल्टिफॅक्टर झाले होते. त्यांच्या शरीरावर आणि डोक्याला अनेक जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर ऑपरेशन देखील पार पडले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत होते.

त्यांच्या मेंदूतील गाठ आणि बरगडी, खांदा, मानेला फ्रॅक्चर झाले होते. कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले होते की समीर खान यांची प्रकृती गंभीर आहे. त्यानंतर काल शनिवारी त्यांचे निधन झाले. या अपघातातील चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.

नवाब मलिक पुन्हा येणार अ‍ॅक्शनमध्ये! निवडणुकीच्या मैदानातही दिसणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

follow us