Maharashtra Assembly Election 2024 : प्राजक्त तनपुरे यांचे पारंपारिक विरोधक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांची साथ सोडली आहे. त्यांनी आता काँग्रेसमध्ये यांनी प्रवेश केला आहे. (Rahuri) त्यामुळे तनपुरे यांची ताकद आणखी वाढली आहे.
कोण आहेत चाचा तनपुरे ?
चाचा तनपुरे हे राहुरी साखर कारखान्याचे संचालक होते. तसंच, चारवेळा राहुरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत. विकास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. 2016 मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात चाचा तनपुरे हे मुख्य विरोधक देखील होते. मात्र प्राजक्त तनपुरेंकडून त्यांचा पराभव झाला.
Video: गणेशचा आणि विधानसभेचा काडीचा संबंध नाही; काळेंनी कोल्हेंची हवाच काढली!
प्रजाक्त तनपुरे यांचा राहुरी शहरातील मुख्य विरोधक म्हणून चाचा तनपुरे यांच्याकडेच बघितलं जात होतं. मात्र, चाचा तनपुरे यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाल्यामुळे शिवाजी कर्डिले यांना मोठी अडचण होणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या या मतदार संघातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला भाग म्हणजे राहुरी शहर आणि राहुरी शहरातील मुख्य विरोधक हे रावसाहेब चाचा तनपुरे होते.
या पक्षप्रवेशावेळी चाचा तनपुरे यांनी बोलताना सांगितलं की, शिवाजी कर्डिले यांच्या त्रासामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये तनपुरे यांना ही निवडणूक आणखी सोपी झाली आहे आणि कर्डिले यांच्यापुढं मोठं आव्हान उभं राहिले आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर असा मोठा पक्ष प्रवेश हा कर्डिलेंसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो असं बोललं जात आहे.