Rahuri कृषी विद्यापीठासमोर अभियंत्यांच मुंडन आंदोलन

  • Written By: Published:
Rahuri कृषी विद्यापीठासमोर अभियंत्यांच मुंडन आंदोलन

राहुरी : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस. त्यामुळे दहाव्या दिवशी कृषी अभियंत्यांनी मुंडन करून राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेचा निषेध केला.

कृषी अभियंत्यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू आहे. काल प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले होते तर आज कृषी अभियंत्यांनी मुंडन करून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निषेध केला. १० दिवस आंदोलन सुरू असूनही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने या आंदोलनाची काहीही दखल घेतलेली नाही. त्याचा निषेध आज करण्यात आला. दरम्यान, शेतकरी नेते पाशा पटेल यांनीही आंदोलकांना पाठिंबा दर्शविला.

कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी आज आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्या न्याय आहेत त्यांच्या मागण्याशी चारही कृषी विद्यापीठ सहमत आहेत. या मागण्या मान्य होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल यांच्याशी संपर्क साधलेला आहे. उपमुख्यमंत्री लवकरच या प्रश्नाला न्याय देतील असा विश्वास त्यांनी आंदोलकांना दिला.

 


Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube