Video: ‘गणेशचा’ आणि विधानसभेचा काडीचा संबंध नाही… काळेंनी कोल्हेंची हवाच काढली!

  • Written By: Published:
Video: ‘गणेशचा’ आणि विधानसभेचा काडीचा संबंध नाही… काळेंनी कोल्हेंची हवाच काढली!

Ashutosh Kale Exclusive On Letsuup Marathi : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना येथील युवा नेते विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करत विखे पाटलांना राजकीय विरोध सुरू केला. गणेश कारखाना निवडणूक आणि तीन ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे-थोरात पॅटर्नने विखे पाटलांना धोबीपछाड दिली होती. त्यानंतर आता कोपरगावमध्ये विधानसभा निवडणुकीचेही वातावरण फिरले असल्याचे बोलले जात होते. पण या गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा आणि विधानसभा निवडणुकीचा काडीचाही संबंध नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी केला आहे. ते ते लेट्सअप मराठीच्या लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात बोलत होते.

Video: हे प्रेम नसून अफेअर, मुख्यमंत्र्यांनी तर अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला; संजय राऊतांची टोलेबाजी

आशुतोष काळे म्हणाले. गणेश कारखान्याचा इतिहास जर पाहिला तर तो कारखाना पारंपारिक कोल्हे यांच्याकडे होता. अशोकराव काळे यांनी या कारखान्याची निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचे ९ सदस्य निवडून आले होते. त्यानंतर चार पॅनल होते. त्यामध्ये कोल्हे यांचा एक, विखे पाटील यांचा, आमचा आणि एक चौथा पॅनल होता. त्यामध्ये परत कोल्हे यांची सत्ता आली. त्यानंतर तो कारखाना बंदच बडला. कोल्हे यांच्या पॅनलनेच हा कारखाना बंद पाडला, असा थेट आरोपही यावेळी काळे यांनी केला.

पुढे या बंद पडलेल्या कारखान्याची निवडणूक झाली. त्यामध्ये विखे पाटील यांचं पॅनल बिनविरोध निवडून आलं. त्यामध्ये आम्ही भाग घेतला नाही. अशा दोन निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामध्ये आम्ही भाग घेतला नाही. पुढे हा कारखाना विखे पाटील यांनी चालू केला. आमच्या लोकांचा ऊस तिथे जात नव्हता. हे असं वातावरण असेल तर ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांनी उमेदवारी टिकणार कशी असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या कारखान्यामुळे कोल्हे यांचं मनोबल उंचावल आहे. त्यांना या कारखान्यामुळे कोपरगावमध्ये वातावरण बदललं आहे असं वाटत का? असं विचारल्यावर काळे यांनी या प्रश्नाला थेट फेटाळून लावलं. त्या कारखान्याचा आणि विधानसभा निवडणुकीचा काडीचा संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या कारखान्याचा विषय काही मोजक्या जागेपुरता मर्यादित आहे. तसंच, कोल्हे यांचे सभासद पहिल्यापासूनचं तिथे जास्त आहेत. विखे यांनी याचा राजकीय विचार केला नाही. त्यामुळे त्यांनी सभासद नोंदणी काही वाढवलेली नाही. असंही ते म्हणाले आहेत.

RSS : लोकसभेची पुनरावृत्ती नको; जातीय समीकरणात हिंदुत्वाकडं लक्ष ठेवा, RSS च्या भाजपला सुचना

हा कारखाना दोन टर्म विखे पाटील यांच्याकडे होता. आता तो आम्ही खेचून आणला असा एक समज निर्माण झाला आहे. परंतु, मुळामध्ये हा कारखाना विखे यांच्याकडे नाही तर कोल्हे यांच्याकडेच होता. त्यांनीच तो बंद पाडला होता असंही काळे यावेळी म्हणाले. त्यामुळे या विषयाचा विधानसभेशी काहीही संबंध नाही. झालेली कामे लोकांसमोर आहेत आणि होणारी काम लोक पाहत आहेत असंही आमदार काळे यावेळी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube