Ratan Tata Death : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र सरकारने आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, रतन टाटा यांनी सोशल मीडियावर केलेली अखेरची पोस्ट आता चर्चेत आली आहे. धन्यवाद, तुम्ही माझा विचार केलात, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.
रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात आज दुखवटा; सर्व कार्यक्रम रद्द, मुंबईत होणार अंत्यसंस्कार
रतन टाटा यांना बुधवारी मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथेच उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र दोन दिवस आधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. धन्यवाद, तुम्ही माझा विचार करता असे शब्द त्यांच्या भावनिक पोस्टमध्ये होते. रतन टाटांना रुग्णालयात दाखल करण्यत आलं त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांत बातम्या सुरू झाल्या होत्या. रतन टाटा यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला जात होता. आयसीयूत दाखल केल्याचे सांगण्यात येत होते. या बातम्यांचे खंडन करण्याच्या उद्देशाने रतन टाटांनी ही पोस्ट टाकली होती.
सोशल मिडिया एक्सवर त्यांनी एक पोस्ट लिहीली होती. यात त्यांनी म्हटले होते की माझ्या आरोग्याबाबत पसरलेल्या अफवांची जाणीव मला आहे. सर्व दावे निराधार आहेत. मी सर्वांना खात्री करून देऊ इच्छितो की मी वैद्यकिय तपासणी करत आहे. वय आणि परिस्थितीमुळे मी ही तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाही. माझं आरोग्य चांगलं आहे. मी जनतेला आणि माध्यमांना विनंती करू इच्छितो की कृपया चुकीची माहिती पसरवू नका.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय उद्योजक आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात रतन टाटा हे टाटा ग्रुपचे चेअरमन होते. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक किर्तीमान स्थापित केले. टाटा समुहाला त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं त्याचबरोबर एक उदारवादी माणूस म्हणूनही त्यांनी नाव मिळवलं. हेच कारण आहे की देशातील अगदी लहान व्यापारी असो की मोठा उद्योजक किंवा उद्योग विश्वात दाखल होणारा प्रत्येक जण रतन टाटांना आपला आदर्श मानतो.
रतन टाटांच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण होणार? आपल्यामागे ‘इतकी’ संपत्ती सोडून गेले टाटा