रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात आज दुखवटा; सर्व कार्यक्रम रद्द, मुंबईत होणार अंत्यसंस्कार

रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात आज दुखवटा; सर्व कार्यक्रम रद्द, मुंबईत होणार अंत्यसंस्कार

Ratan Tata Death : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र सरकारने आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. आजच्या दिवशी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, आज पूर्ण राजकीय सन्मानासह रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Ratan Tata यांची अशीही भूतदया! एक आदेश अन् भटका कुत्रा ‘ताज’मध्ये निवांत झोपतो 

रतन टाटा सन १९६२ मध्ये टाटा इंडस्ट्रीमध्ये सहायक म्हणून सहभागी झाले होते. नंतर त्याच वर्षात टाटा इंजिनीरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीच्या जमशेदपूर युनिट मध्ये सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं. विविध कंपन्यांत काम केल्यानंतर १९७१ मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी निदेशक म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. १९८१ मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

सन १९९१ ते २८ डिसेंबर २०१२ रोजी सेवा निवृत्तीपर्यंत रतन टाटा हे टाटा सन्स या कंपनीचे अध्यक्ष होते. या दरम्यान टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल ब्रेवरेज, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेली सर्व्हिसेस सहित अन्य प्रमुख टाटा कंपन्यांचेही अध्यक्ष होते. भारत आणि विदेशात विविध संघटनांशी त्यांचा संबंध होता. रतन टाटा मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसक्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीत होते. सर रतन टाटा ट्रस्ट, एलाइड ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि एलाइड ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेटल रिसर्चच्या प्रबंधन परिषदेचे रतन टाटा अध्यक्ष होते. कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या बोर्डतही रतन टाटा कार्यरत होते.

‘असिस्टंट’ म्हणून सुरुवात नंतर कंपनीलाच बनवलं इंटरनॅशनल ब्रँड.. रतन टाटांच्या यशाची कहाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रतन टाटा आज आपल्यात नाहीत. ही बातमी सर्वांसाठीच अत्यंत दुःखद आहे. रतन टाटा महाराष्ट्राचा गौरव होते. त्यांनी हजारो लोकांना मदत केली. रतन टाटा आपल्या देशाचे कोहिनूर होते. त्यांनी देशासाठी खूप मोठे योगदान दिलं. ते एक देशभक्त आणि देशप्रेमी होते. रतन टाटा यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे की त्यांचे पार्थिव शरीर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत एनसीपीए येथे ठेवले जाणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे आज मुंबई आणि राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube