रतन टाटांच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण होणार? आपल्यामागे ‘इतकी’ संपत्ती सोडून गेले टाटा
Ratan Tata Death : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र सरकारने आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. आजच्या दिवशी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, रतन टाटा अविवाहीत होते. त्यामुळे त्यांच्यानंतर आता टाटा समुहाचा वारसदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.
‘असिस्टंट’ म्हणून सुरुवात नंतर कंपनीलाच बनवलं इंटरनॅशनल ब्रँड.. रतन टाटांच्या यशाची कहाणी
रतन टाटा सन १९६२ मध्ये टाटा इंडस्ट्रीमध्ये सहायक म्हणून सहभागी झाले होते. नंतर त्याच वर्षात टाटा इंजिनीरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीच्या जमशेदपूर युनिट मध्ये सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं. विविध कंपन्यांत काम केल्यानंतर १९७१ मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी निदेशक म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. १९८१ मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
1937 मध्ये रतन टाटांचा जन्म
देशातील सर्वाधिक लोकप्रिय उद्योजक आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात रतन टाटा हे टाटा ग्रुपचे चेअरमन होते. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक किर्तीमान स्थापित केले. टाटा समुहाला त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं त्याचबरोबर एक उदारवादी माणूस म्हणूनही त्यांनी नाव मिळवलं. हेच कारण आहे की देशातील अगदी लहान व्यापारी असो की मोठा उद्योजक किंवा उद्योग विश्वात दाखल होणारा प्रत्येक जण रतन टाटांना आपला आदर्श मानतो.
TATA: टाटा ग्रुपचा ऐतिहासिक निर्णय! कंपनीमध्ये लागू होणार आरक्षण, वंचित घटकांना मिळणार न्याय
रतन टाटांनी जवळपास ३८०० कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली होती. तसेच टाटा समुहाचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आता त्यांच्या निधनानंतर या साम्राज्याचा वारसदार कोण असणार, रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण असणार असे प्रश्न लोकांना पडले आहेत.
रतन टाटा अविवाहित
रतन टाटा यांनी कधीच लग्न केले नाही. आयुष्यभर ते अविवाहीत राहिले. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल अशी चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. आता त्यांच्या निधनानंतर या चर्चा जोरात ऐकू येऊ लागल्या आहेत. रतन टाटांनी टाटा सन्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर 2017 पासून एन. चंद्रशेखर कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच टाटा समुहातील विविध कंपन्या टाटा परिवारातील विविध लोक चालवतात. टाटा यांच्या जवळचे लोकही उद्योग समुहात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
सावत्र भावाचं नाव आघाडीवर
टाटांनंतर नोएल टाटा यांचं नाव आघाडीवर आहे. टाटांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्न केले होते. त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांचे पुत्र नोएल टाटा आगामी काळात टाटांच्या साम्राज्याची धुरा सांभाळताना दिसू शकतील. नोएल टाटा हे दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. आता रतन टाटांनतंर नोएल टाटा यांच्या हाती सर्व कारभार जाण्याची शक्यता आहे.
रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात आज दुखवटा; सर्व कार्यक्रम रद्द, मुंबईत होणार अंत्यसंस्कार
माया टाटाही प्रबळ दावेदार
नोएल टाटा यांच्या कन्या माया टाटा यांचंही नाव आघाडीवर आहे. माया टाटा सध्या टाटा समुहात महत्वाची जबाबदारी पार पाडतआ आहेत. माया टाटा या टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजीटलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे माया टाटा देखील या शर्यतीत आघाडीवर आहेत. कदाचित त्या देखील टाटा समुहाच्या उत्तराधिकारी ठरू शकतात.
नेविल टाटा हे नोएल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यामुळे 32 वर्षीय नेविल टाटा देखील टाटा साम्राज्याचे पुढील वारसदार ठरू शकतात. नेविल टाटा यांचा विवाह टोयोटा किर्लोस्कर समुहाच्या मानसी किर्लोस्कर यांच्याबरोबर झाला आहे. स्टार बझारचे प्रमुख म्हणून नेविल टाटा सध्या काम पाहत आहेत. तसेच नोएल टाटा यांची सर्वात मोठी मुलगी लीह टाटा देखील उत्तराधिकारी ठरू शकते. लीह टाटा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करत आहेत. ताज हॉटेल्स आणि रिसॉर्ट, पॅलेसचा कारभार सध्या लीह पाहत आहेत.
रतन टाटा किती संपत्ती ठेऊन गेले
टाटा ग्रुपचा कारभार जगभरात पसरला आहे. घरातील स्वयंपाकाच्या साहित्यापासून ते अगदी विमानापर्यंत टाटांचं नाव आहे. टाटा समुहाच्या 100 पेक्षा जास्त लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्या आहे. या कंपन्यांची एकूण उलाढाल 300 अब्ज डॉलर्सची आहे. दिवंगत रतन टाटांनी किती संपत्ती मागे ठेवली आहे या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर रिपोर्ट्सनुसार रतन टाटा आपल्यामागे जवळपास 3800 कोटी रुपयांची संपत्ती ठेऊन गेले आहेत.