Download App

दोन महिन्यांपूर्वी लंडनहुन आली अन परत जायच्यावेळी ड्राव्हरसोबत पळाली : बड्या अधिकाऱ्याच्या मुलीचा प्रताप

मुंबई : मुंबईमध्ये (mumbai ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे एका अधिकाऱ्याच्या लंडनमध्ये शिकत असलेल्या मुली बाबतची. नुकतच भारतात येताच या 19 वर्षे तरुणीला एका ड्रायव्हरने फुस लावून पळून गेले होते. मात्र हा प्रकार लक्षात येताच तरुणीच्या घरच्यांनी यासंबंधी पोलिसांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या ड्रायव्हरला तरूणीसह कळव्यातून ताब्यात घेतले आहे.

Sunny Deol: ‘बॉर्डर 2’ आणि ‘गदर 3’ च्या सिक्वेलवर सनी देओलने थेटच सांगितलं, म्हणाला…

यावेळी या दोघांनी पोलिसांना आपण लग्न केल्याचे सांगितलं. तर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी या मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. तर ड्रायव्हरला चौकशीसाठी थांबवून घेतलं. बजरंग मौर्या ( वय 35 वर्ष) असे या मुलीला पळवून नेणाऱ्या ड्रायव्हरचं नाव आहे. तर ही तरुणी एका बड्या सरकारी अधिकाऱ्याची मुलगी आहे. 13 जानेवारीला लंडनला जायला निघाली असताना ही तरूणी अचानक गायब झाली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

लंडनमध्ये शिकत असलेली ही तरुणी डिसेंबर महिन्यात घरी आला होती. त्यानंतर पुन्हा लंडनला परत जात असताना तिच्या घरचे देखील तिला सोडवण्यासाठी सोबत होते. मात्र यावेळी या तरुणीने ताडदेव या ठिकाणी गाडी थांबवली. आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. असे सांगून ती निघून गेली. ती परत आलीच नाही. त्यानंतर तरुणीचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. तर आपली मुलगी ड्रायव्हर सोबत पळून गेल्याचं कळताच घरच्यांनी या ड्रायव्हर विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’

त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरणाचा छडा लावत या ड्रायव्हर सह तरुणीला कळव्यातून ताब्यात घेतले. तरूण तरूणींनी प्रेमसंबंधांतून अशाप्रकरे पसार झाल्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र अशा प्रकरे एका अधिकाऱ्याची मुलगी आणि ती देखील परदेशात शिकत असलेली. तसेच ती केवळ 19 वर्षांची असताना अशा प्रकारे एका 35 वर्षींच ड्रायव्हरसोबत पळून गेल्याने परिसरात सर्वच आवाक् झाले असून चर्चा सुरू झाली आहे.

follow us