Download App

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा राजकीय स्टंट? पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya)प्रभूरामाच्या मूर्तीची (Prabhuram Murthy)प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य (Shankaracharya)यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटलं आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं असून ते पाप ठरेल, असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा (BJP)स्टंट करत आहे का? हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट करु नये, अशीच बहुसंख्य हिंदूंची भावना असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

XPoSat Mission समोर आणणार ब्लॅक होलचं रहस्य; वर्षांच्या पहिल्याचं दिवशी इस्त्रोची भरारी

मुंबईमधील टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना नाना पटोलेंनी परखड शब्दांमध्ये उत्तरं दिली. यावेळी पटोलेंना पत्रकारांनी भाजप अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा राजकीय स्टंट करत आहे का? असा सवाल केला. त्यावेळी नाना पटोलेंनी परखडपणे भूमिका स्पष्ट केली.

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याला सहा महिन्यांची शिक्षा, कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

चारही शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, अपूर्ण काम असणाऱ्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं हे मोठं पाप होईल. भाजपला कोणीही असं करण्याचा अधिकार दिला नाही, असंही शंकराचार्यांनी म्हटलं आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

आता शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रमुख आहेत. त्यामुळं शंकराचार्यांचं मतं अशा पद्धतीनं समोर येत आहे. तर सत्तेचा दुरुपयोग करुन भाजप राम मंदिराचा दुरुपयोग करुन घेत असतील तर हे धर्मासाठी चुकीचं आहे.

त्यामुळं आमचं सत्ताधाऱ्यांना मत एवढंच आहे की, धर्मभ्रष्ट करु नका. जे स्वत:ला भगवान श्रीरामाचे ठेकेदार समजतात, त्यांना एवढाच सल्ला असल्याचे म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर घणाघाती हल्लाबोल केला आहे.

follow us