Download App

मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही माहिती दिली.

  • Written By: Last Updated:

Mumbai School Holiday : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने (Mumbai Rain) आज राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला झोडपून काढलं. मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. उद्याही मुंबईला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात करण्यात आला. या अनुषंगाने उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही माहिती दिली.

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार! रस्त्यांना नदीचं रुप, दोन विमाने हैदराबादकडे वळवली, BMC कडून हायअलर्ट जारी… 

उद्या शाळेसाठी घराबाहेर पडताना विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुंबईचे केसरकर यांनी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. केसरकर म्हणाले, उद्या सकाळी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचल्याने ते ओसरायला उद्याचाही दिवस जाणार आहे. याकाळात सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी नियंत्रण कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासाठी ऑरेंज तर नाशिक पालघरला रेड अलर्ट; पावसाची स्थिती काय? 

दरम्यान, मुंबई महापालिकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटनुसार हवामान खात्याने उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहेत. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं.

आज झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अंधेरी सबवेवर दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मुलुंड आणि विक्रोळी पट्ट्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. फास्टट्रॅकवर वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. तर विक्रोळी ते भांडुप परिसरात ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी आहे. दरम्यान, उद्याही मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

follow us