Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासाठी ऑरेंज तर नाशिक पालघरला रेड अलर्ट; पावसाची स्थिती काय?
Maharashtra Rain Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस (Maha) सुरुच आहे. तर पुढील दोन दिवस मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुण्याला ऑरेंज तर, नाशिक, पालघरला रेड अलर्ट देण्यात आलायं.
तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवू; बॅनरबाजीवरुन सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावलं
26 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रासह, गुजरात, कोकण, गोव्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्ात आलीयं. मध्य महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पडणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
महापारेषण पिंपरी चिंचवड येथे नोकरीची संधी, 23 पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
मुसळधार पावसामुळे मुंबईतील मुलूंड आणि भांडूप उपनगरामध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. अऩेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून वाहतुक व्यवस्थाही कोलमडलीयं. पुढील दोन दिवस पुणे, रायगड पालघरमध्ये पावसासाठी रेड अलर्ट दिला असून मुंबई ठाण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.
केजरीवालांचे मोहन भागवतांना पत्र! अडवाणींचा निवृत्तीचा नियम मोदींना लागू होणार का? ‘५’ प्रश्न कोणते?
पुण्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरु असून या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. पुण्याच्या बाहेरील ईशान्येला एक गडगडाटी वादळ तयार झालं असून ते शहराच्या पश्चिमेकडे सरकलं असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीयं.
पुण्यात कुठे जोरदार पाऊस?
पुणे शहरातील मगरपट्टा, वडगाव शेरी, कल्याणीनगर, येरवडा, धानोरी, लोहगाव, घोरपडी, भागांत जोरदार पाऊस झालाय. तसेच कात्रज, सिंहगड, वारजे, कोथरुड भागांतही पावसाचा जोर चांगलाच दिसून येत आहे.