मुंबई वन मेट्रो अॅपला मुंबईकरांचा प्रतिसाद! प्रवासी संख्येत वाढ, महसुलातही भर

Mumbai One Metro app डाऊलोड करून ते नंबर वन ठरणार असल्याचे मुंबईकरांनी दाखवून दिले आहे. यामुळे आपोआप प्रवासी संख्या आणि महसुलातही भर पडत आहे.

Mumbai One Metro App

Mumbai One Metro App

Mumbaikars’ response to Mumbai One Metro app! Increase in passenger numbers, revenue also increases : राज्याच्या वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थेत कोणत्याही पदाच्या खुर्चीत असल्या तरीही; धडाकेबाज निर्णय आणि त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करणाऱ्या महामुंबई मेट्रोच्या ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ (एमडी) रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारातून तयार झालेले ‘मुंबई वन’ अॅप मुंबईकरांनी अक्षरशः डोक्यावरच घेतले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या तब्बल दीड लाख मुंबईकांनी पहिल्या तीन-साडेतीन दिवसांतच ‘मुंबई वन’ अॅप डाऊलोड करून हे अॅप नंबर वन ठरणार असल्याचे दाखवून दिले आहे. या अॅपमुळे आपोआप मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होऊन महसुलातही भर पडत आहेत. त्यामुळे हे मुंबई वन मेट्रोसाठी दुहेरी फायदा देणार, हे निश्चित आहे.

‘मला आरएसएसचा तिरस्कार’ केरळमध्ये 26 वर्षीय इंजिनिअरची 15 पानी सुसाईड नोट लिहित जीवन संपवलं?

मुंबई शहरासह उनपगरांमध्ये विशेषतः ‘एमएमआरडीए’च्या हद्दीत नागरीकरण झपाट्याने विस्तारत असून, परिणामी वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी नेहमीचच झाली आहे. यावर उपाय भ्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुरळीत करण्यावर सरकारी यंत्रणांचा भर आहे.

मी कुठेच नाही तर, मोदींकडे जाईल; भुजबळांच्या मनात काय?

त्यात, मेट्रोचे जाळे वाढवून ही सेवा सर्वत्र पुरविण्याचा प्रयत्न आहे. मुंबईसह पाच महापालिकांच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा एका ‘मुंबई वन’ अॅपवर आणली आहे. मेट्रोसह मुंबई, उपनगरांमधील लोकल, मुंबईतील बेस्ट आणि इतर महापालिकांकडील बससेवा यांना हे अॅप जोडले आहे. त्यातून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट सेवा उपलब्ध देत, रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारातून महामुंबई मेट्रोने ‘मुंबई वन’ विकसित केले आहे. या अॅपमुळे मेट्रो, लोकल, बसचे तिकीट बुक करता येणार आहे.

संजय राऊतांची प्रकृती बिघडली, पत्रकार परिषद संपताच मुलंडच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल

या योजेनमुळे मुंबईकरांमध्ये उत्साह असून, अशा प्रकारे पहिल्यांदाच डिजिटल तिकीट मिळत असल्याने दर तासाला किमान दोन ते अडीच हजार मुंबईकर हे अॅप डाऊनलोड करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अॅपचे लाँचिंग शुक्रवार होताच, पहिल्या आठ तासांत तब्बल ३५ हजार मुंबईकरांनी अॅप घेतले. त्यानंतर हे आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, गेल्या साडेतीन दिवसांत सुमारे दीड लाख लोकांनी मुंबई वन आपले घेतले आहे. पुढच्या वर्षेभरात तब्बल 50 लाख मुंबईकरांच्या हातात हे अॅप असेल, असा दावा महामुंबई मेट्रोचा आहे. त्यामुळे मुंबईत या अॅपचा जलवा राहणार, हे नक्की.

अॅपचा फायदाच फायदा…

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा यंत्रणांचा प्रयत्न आहे. परंतु, गेल्या काही वर्षात या वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करीत असताना, प्रवाशांना जोडून ठेवणारी प्रभावी सुविधा नव्हती. मात्र, महामुंबई मेट्रो आणि रुबल अग्रवाल यांच्या प्रयत्नातून ‘मुंबई वन’ चा प्रभावी पर्याय प्रवाशांना मिळाला आहे. त्यामुळे बेस्ट आणि लोकलच्या प्रवाशांनाही ही सुविधा वापरता येणार आहे.

घायवळ आणि भाजपची मिडिया! रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत थेट नावंचं घेतले…

त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होईल. विनातिकिट प्रवास करणाऱ्यांना चाप बसेल. दुसरीकडे मेट्रो आणि इतर वाहतूक व्यवस्थेचा महसूल वाढून आर्थिक स्थिरता येण्यास मदत होईल. मुंबई वन अॅप लोकांना सहजरित्या वापरता यावे, विशेषतः त्यातील ज्या काही सेवा आहेत, त्यांच्या वापरासाठी मेट्रोने ‘वायफाय’ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे अॅप हाताळण्यात कोणत्याही अडचणी राहणार नाही, याची काळजी घेतली आहे.

Exit mobile version