Download App

शरद पवारांसोबत पार्टनरशीप करुन देतो : ऑफर ऐकताच कॉन्स्टेबलने सगळं विकलं अन् 93 लाखांची फसवणूक

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी व्यावसायिक पार्टनरशीप करुन देतो, असे म्हणत मुंबई पोलीस दलातील हवालदार विजय गायकवाड यांना गंडा घातला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी व्यावसायिक पार्टनरशीप करुन देतो, असे म्हणत मुंबई पोलीस दलातील हवालदार विजय गायकवाड यांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांची तब्बल 93 लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी अपूर्व जगदीश मेहता (48) रा. गोरेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (name of sharad pawar partnership Constable sold everything and cheated 93 lakhs)

जान्हवी कपूर स्टारर ‘गुड लक जेरी’ची 2 वर्षे पूर्ण, निर्मात्यांनी शेअर केली खास गोष्ट

याबाबतत अधिक माहिती अशी की, विजय गायकवाड हे 2020 पासून मुंबई विमानतळावर तैनात आहेत. गायकवाड आणि मेहता यांची विमानतळावर अनेकदा भेट व्हायची. याच भेटीतून त्यांची ओळख झाली. भेटीतील चर्चांदरम्यान, मेहता हा नेहमीच आपले राजकारण्याशी वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध असल्याचा दावा करत असे. 2021 मध्ये मेहता याने गायकवाड यांना आपण शरद पवार यांच्या आदेशाने व्यवसाय सुरु करणार असल्याचे सांगितले.

Paris Olympics 2024 : अर्जेंटिनाला धक्का, हॉकीमध्ये भारताने पुन्हा केली कमाल, सामना अनिर्णित

यात गायकवाड यांना भागीदारी करण्याची ऑफर मेहताने दिली. तुम्ही शरद पवार यांचे भागीदार व्हाल, एका कंपनीला तुमच्या लेकीचे नाव देऊ आणि दुसरी कंपनी तुमच्या लेकीच्या नावाने सुरु करु. पण हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक कोटी रुपयांची गरज लागले, असे गायकवाड यांना सांगितले. त्यावर त्यांचा विश्वास बसला. मग त्यांनी त्यांचा फ्लॅट विकला. एलआयसीकडून कर्ज घेतले. पीएफमधून पैसे काढले. आपल्या दोन्ही मुलांचे भविष्य सुरक्षित होईल या हेतून गायकवाड यांनी तब्बल 93 लाख रुपये मेहता यांना सुपूर्द केले. पण अनेक दिवस व्यवसाय सुरु होण्याची चिन्ह दिसत नव्हती.

याबद्दल विचारणा केली असता, तुमच्या मुलीच्या कुंडलीत राहू दोष आहे, त्यासाठी दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा करावी लागेल, असा सल्ला मेहतानी गायकवाड यांना दिला. त्यावर गायकवाड यांनी विश्वास ठेवून सर्व पूजा केली. यानंतर गायकवाड यांना दिंडोशी न्यायालयात बोलावून घेण्यात आले. तिथे काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली. पण कंपनी काही सुरु झाली नाही. त्यावर आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच सहार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मेहता यांच्याविरोधात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणात अद्याप तपास सुरु असून मेहता यांना अटक झालेली नाही.

follow us