Download App

मंत्रिमंडळात कचरा खाण्यासाठी गॅंगवॉर; मुंबईतील कचरा व्यवस्थापन टेंडरवरून पटोले भडकले

Nana Patole यांनी सरकारमधील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना या पक्षांना मुंबईतील कचरा व्यवस्थापन टेंडरवरून धारेवर धरल्याचे पाहायला मिळालं.

Nana Patole Agressive on BJP and Shivsena for Waste management tender in Mumbai : मुंबईमध्ये धारावी या जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या जागेवर उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडून धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत पन्नास हजार घर बांधली जाणार आहेत. मात्र यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवरून देखील वाद निर्माण झाला आहे. त्यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारमधील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना या पक्षांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळालं.

काय म्हणाले नाना पटोले?

धारावी पुनर्विकास प्रकल्पात जे लोक अपात्र ठरणार आहेत. त्यांना रेंटल हाऊसिंगमध्ये ठेवले जाणार आहे. त्यासाठी अदानी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ५० हजार घरे बांधणार आहे. यासाठी देवनार डंपिंग ग्राऊंडची जागा देण्यात आली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, तरी कामकाज इंग्रजीत का? विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक

मात्र 185 लाख मेट्रिक टन कचरा मुंबई महानगर पालिकेने साफ करुन द्यायचा आहे. त्यासाठी 2368 कोटी रुपये महापालिकेला खर्च करावे लागणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे टेंडर आहे. तीन वर्षांसाठी हे टेंडर काढण्यात आले आहे.23 हजार मेट्रिक टन कचरा रोज उचलायचा आहे. हा खर्च महापालिका करणार आहे.

Sajana Movie : मराठी चित्रपटाचा कलरफुल पॅटर्न : सजना !

हे सर्व दिल्लीतून होत आहे. दिल्लीतील ए गँगसाठी होत आहे. दिल्लीत यांचा आका बसल्या आहेत. मंत्रिमंडळातील गंगवार कचरा खाण्यासाठी सुरू आहे. दिल्ली सांगेल तसा हे सरकार करत आहे. याचे कॉन्ट्रॅक्ट एकनाथ शिंदे यांच्या माणसाने दिले. महापालिका ही काम करत असल्याने मुंबईकरावर आर्थिक कर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

follow us