Download App

ढालीप्रमाणे उभे राहिलात पण…; सोमय्या व्हिडिओ प्रकरणात आव्हाडांच्या मुलीची एन्ट्री

  • Written By: Last Updated:
Natasha Awhad Tweet On Kirit Somayya Controversy : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वेगळाच सुर पकडत व्यक्तीगत हल्ले करून एखाद्याचं राजकीय जीवन संपवायचं, असे म्हणत सोमय्यांची बाजू घेतली आहे. तसेच याचा मी निषेध करतो, असं ट्वीट आव्हाड यांनी केले. त्यानंतर आव्हाडांच्या मुलीने ट्विट केले आहे. त्यात तिने किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. मात्र, कौतुक करण्याबरोबरच आव्हाडांच्या मुलीने पुर्वी घडलेल्या घटनेचीही आठवण करून दिली आहे.

आव्हाडांच्या मुलीचे ट्विट नेमके काय?
बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद असल्याचे आव्हाडांची मुलगी नताशा आव्हाडने म्हटले आहे.

वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाच नाही

दरम्यान, सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उटवली जात होती. मात्र, या सर्व प्रकरणात कडाडून टीका होत असताना इतरवेळी आक्रमक दिसणारे आव्हाड यावेळी सोमय्यांच्या पाठिशी एखाद्या ढालीप्रमाणे उभे ठाकले आहेत.
सोमय्याप्रकरणात काल (दि.18) आव्हाडांनी ट्विट करत वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाच नसल्याचे म्हटले होते. तसेच राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.

त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.

मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबा-याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही.

Tags

follow us