Download App

नवाब मलिकांची पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढली, याचिका फेटाळली

Nawab Malik Judicial Custody: राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून, त्यांना आता 30 मेपर्यंत कारागृहातच राहावे लागणार आहे. मलिक गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत.

ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तांच्या खरेदीत पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराच्या आरोपावरून ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिकला अटक करण्यात आली आहे.

कोण आहेत नवाब मलिक
नवाब मलिक यांचे राजकीय करिअर 80 च्या दशकात युवक काँग्रेसमधून सुरू झाले. मात्र, संजय गांधींच्या निधनानंतर स्थापन झालेल्या ‘संजय विचार मंच’मध्ये ते सामील झाले. दिवंगत संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी ही संघटना स्थापन केली होती.

नवाब मलिक यांनी 1984 मध्ये ईशान्य मुंबईतून संजय विचार मंचच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. राजकारणातील दोन दिग्गज गुरुदास कामत आणि प्रमोद महाजन यांच्यासमोर या निवडणुकीत नवाबांचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आणि नंतर संजय विचार मंचही बरखास्त झाला.

कर्नाटक निवडणुकीत भाजपची नाचक्की… 30 ठिकाणी डिपॉझिट जप्त

यानंतर नवाब मलिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना विशेष काही मिळू शकले नाही. त्यानंतर 1992 मध्ये राम मंदिर आंदोलन आणि बाबरी ढाचा पाडल्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगलीनंतर मुंबईच्या राजकारणात बरेच बदल झाले.

वास्तविक त्या काळात समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव हे मुस्लिमांचे नेते म्हणून उदयास आले होते. पक्षाच्या विस्तारासाठी त्यांनी राज बब्बर यांना महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून पाठवले. त्या काळात तत्कालीन सपा नेते बब्बर यांनी पक्षात समाविष्ट केलेल्या लोकांमध्ये नवाब मलिक देखील एक प्रमुख चेहरा होता.

उद्धव ठाकरे अन् संजय राऊत हे डिप्रेशनमध्ये; राणेंचा खोचक टोला

1995 मध्ये नवाबने मुंबईच्या मुस्लिमबहुल भागातील कुर्ला नेहरू नगर या जागेवरून सपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली, परंतु शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर शिवसेनेच्या आमदाराचे निधन झाले आणि 1997 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली. यामध्ये मलिक समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढले आणि विजयी झाले.

मुलायमसिंह यादव यांनी 1999 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा नवाब मलिक यांना सपाचे तिकीट दिले. मागच्या वेळेप्रमाणेच त्यांनी पुन्हा विजय मिळवला. सलग दोनवेळा सपाच्या तिकिटावर विजयी झालेले नवाब मलिक यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी नवाब मलिक यांनी नेहरू नगरमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयाची हॅट्ट्रिक केली.

समीर वानखेडे ‘या’ तीन गोष्टीमुळं अडचणीत, CBI कडून चौकशीचा फास

नेहरू नगरच्या ऐवजी निर्माण झालेल्या अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नवाब मलिक यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. त्यानंतर 2012 च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मलिक यांनी अणुशक्ती नगर मतदारसंघातून पाचव्यांदा विजयाचा झेंडा फडकावला.

Tags

follow us