Download App

ठाण्यात NCB कडून आंतरराज्यीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश; नायट्राझेपमसह दोघांना अटक

निवडणुकीदरम्यान अंमली पदार्थांच्या तस्करीची योजना आखण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

ठाणे : अंमली पदार्थ नियंत्रण विभाग म्हणजेच NCB कडून ठाण्यात मोठी कारवाई करत आंतरराज्यीय ड्रग्ज (Drug) सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 3,600 नायट्राझेपम गोळ्या आणि कोडीन सिरपच्या 270 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे सिंडिकेट महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याचे NCB चे म्हणणे आहे. (NCB Busts Interstate Drug Racket In Thane)

Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

टीप मिळाली आणि कारवाई केली

निवडणुकीदरम्यान अंमली पदार्थांच्या तस्करीची योजना आखण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ज्यात कुख्यात आंतरराज्यीय ड्रग सिंडिकेटने मुंबई महानगर परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करण्याची योजना आखल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि.10) कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा लावण्यात आला. त्यावेळी एसएस खान आणि एम खान नावाची व्यकींना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतल्आनंतर आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 3600 नायट्राझेपम गोळ्या आणि कोडीन सिरपच्या 270 बाटल्या आढळून आल्या. चौकशीत आरोपींनी मुंबई, ठाणे, कल्याण आणि इतर एमएमआर क्षेत्रांमध्ये ड्रग्सच्या खरेदीमध्ये त्यांचा स्वेच्छेने सहभाग असल्याचे कबुल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्थानिक वितरक आणि त्याच्या प्रमुख सहकाऱ्यांसह दोन व्यक्तींचा समावेश असल्याचे एनसीबीचे अतिरिक्त संचालक (मुंबई) अमित घावटे यांनी सांगितले. टोळीतील इतर सदस्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी तसेच संपूर्ण ड्रग नेटवर्क निष्फळ करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचेही एनसीबीने म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज