Sharad Pawar Criticized Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रदर्शन काल मुंबईत झाले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
… म्हणून संजय राऊतांना अटक, ‘नरकातला स्वर्ग’ प्रकाशन सोहळ्यात शरद पवार स्पष्टच बोलले
खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल विचारलं तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी राऊतांना खोचक टोला लगावला होता. मी कथा कादंबऱ्या वाचणं केव्हाच सोडलं आहे. तसंच आथा बालवाड्मय वाचण्याचं माझं वयही राहिलेलं नाही. अशा गोष्टींवर फार गंभीरपणे विचार करण्याची गरज नाही. ते कोण आहेत? मोठे नेते आहेत का? असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ घेत शरद पवारांनी त्यांना टोला लगावला.
सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पुस्तक न वाचताच कसं समजलं ते माहिती नाही. संजय राऊत आणि पुस्तकावर सध्या प्रचंड टीका सुरू आहे. कुणी म्हणालं बालसाहित्य वाचत नाही. कुणी आणखी काय सांगितलं. अनेक मतं मांडली गेली. या पुस्तकात जी माहिती आहे त्यातून सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचं उत्तम लिखाण केलं आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले.
ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी संजय राऊत कायम बोलत असतात. अन्यायाविरोधात सामानातून ते आपली रोकठोक भूमिका मांडत असतात. मागच्या काळात राऊतांच्या भूमिकेने काही लोक अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांना अटक झाली. असं म्हणत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर हल्लाबोल केला. संजय राऊतांनी पुस्तक लिहून फार मोठं काम केलं आहे. असं देखील शरद पवार म्हणाले.
तर संजय राऊत यांचं पुस्तक प्रसिद्ध होणार आहे, हे आपण गेल्या दोन दिवसांपासून ऐकत आहोत. मला आश्चर्य वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक न वाचता कसं समजलं? या पुस्तकावर प्रचंड टीका केली जात आहे. राऊतांवरही गेल्या दोन दिवसांपासून टीका केली जात आहे. कोणी सांगितलं की मी बालसाहित्य वाचत नाही. कोणी आणखी काही टीका केली, असं देखील शरद पवार म्हणाले.
बाळासाहेबांनी शाहांना मदत केली होती का? उद्धव ठाकरे म्हणाले, उपकार मोजायचे नसतात…