बाळासाहेबांनी शाहांना मदत केली होती का? उद्धव ठाकरे म्हणाले, उपकार मोजायचे नसतात…

Uddhav Thackeray On Narkatla Swarg : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ (Narkatla Swarg) पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , टीएमसीचे खासदार साकेत गोखले (Saket Gokhale) देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.
या कार्यक्रमात बोलताना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय राऊत यांना जेव्हा अटक झाली होती तेव्हा त्यांच्या घरांच्या धीर देण्यासाठी मी आणि रश्मी त्यांच्या घरी गेलो होतो मात्र तिथे संजय राऊत यांच्या आईने आम्हाला धीर दिला. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपली परीक्षा घेत आहे असं मला वाटते. आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं आणि त्यांच्याकडून कोणी काय घेतलं हे ते बघत आहे. असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
या कार्यक्रमात पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर मराठी माणसांना एक जिद्द दिली नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात आपली हालत काय झाली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेनाप्रमुख बघत आहे की, मी जे दिलं ते घेणारे किती आहे आणि पडणारे भाडकाऊ किती आहे.
आज जे लोक स्वर्गात गेले त्यांच्या हिशोबाने त्यांना सुद्धा कार्यक्रम बघितल्यानंतर हे वाटत असेल की आपण पण इथेच राहिलो पाहिजे होते. आज लोकशाही मानायची कि हुकूमशाही, हुकूमशाहा कोणीही असला तरी त्याला जावेच लागते. स्वतःला गोळी घालून घेणे तसा हिटलर सुद्धा होता. हुकूमशाहाचा शेवट तसाच होतो. असेही या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
… म्हणून संजय राऊतांना अटक, ‘नरकातला स्वर्ग’ प्रकाशन सोहळ्यात शरद पवार स्पष्टच बोलले
तर मला जर कोणी विचारले की, अमित शाह तुमच्या घरी आले होते का? त्यांनी बाळासाहेबांकडे मदत मागितली होती का? तर मी म्हणेण मला आठवत नाही. उपकार मोजायचे नसतात. ते करायचे असतात. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.