Download App

‘ये तो होना ही था’….निकालावरुन जितेंद्र आव्हाडांनीही सत्ताधाऱ्यांना घेरलं…

Jitendra Awhad : ये तो होना ही था अशी सडकून टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही केली आहे. दरम्यान, अनेकांचं लक्ष लागलेल्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं असून खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला आहे. या निकालावरुन आता जितेंद्र आव्हाड यांनीही सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या म्हणाले, “येह तो होना ही था ……#ठाकरे न्यायाची अपेक्षा कोणाकडून करता…जनता न्याय करेल” असं आव्हाडांनी नमूद केलं आहे. आव्हाडांच्या या पोस्टवरुन त्यांचा रोख हा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवरच असल्याचं दिसून येत आहे.

शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर आज रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना याबाबतचे निरीक्षण नोंदविले. यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय देण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय देणार असल्याचे नार्वोेकर यांनी सांगितले होते, त्यानुसार त्यांनी शिवसेनेची घटना, पक्ष संघटना आणि बहुमत या गोष्टींचा आधार घेत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे निर्णय दिला.

“केवळ ठाकरेंच्या मनात आले म्हणून काहीही होऊ शकत नाही…” शिवसेनेतील हुकूमशाही नार्वेकरांकडून संपुष्टात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. याशिवाय भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही नार्वेकर यांनी ग्राह्य धरली आहे. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असून पक्षाचे चिन्हही त्यांच्याकडेच राहणार आहे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

नार्वेकर म्हणाले, दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना ग्राह्य धरण्यात आली. यावर देखील तारीख नव्हती. निवडणूक आयोगाकडे 1999 सालच्या घटनेची प्रत होती. त्यामुळे 2018 साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरण्यात आले नाहीत. तर उलट तपासणीसाठी न आल्यामुळे ठाकरे गटाचं प्रमाणपत्र अमान्य आहे. असेही निरीक्षण नोंदवत त्यांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची झालेली नियुक्ती फेटाळून लावली.

follow us