Download App

अजितदादांची राजकीय ताकद किती? तटकरेंच्या उत्तराने विरोधकांना धडकी

Sunil Tatkare : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आज कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर निशाणा साधत अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकीय ताकद किती आहे याचं उत्तर एकाच शब्दांत दिलं. सुनील तटकरे म्हणाले, सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी असतो हे आज आम्ही दाखवून दिले. आज अजितदादा तुमचे स्वागत ग्रामीण भागात झाले याचा अर्थ अजितदादा तुम्ही जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे आहे हे सिद्ध होते. ५३ पैकी ४३ आमदार अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिले हीच अजितदादांची ताकद आहे, असे तटकरे म्हणाले.

Ajit Pawar : ‘मी शिरुरबाबत जे सांगितलं तेच फायनल’ थेट मतदारसंघात येत अजितदादांनी ठणकावलं!

अजित पवार यांच्या 2 जुलैच्या निर्णयानंतर प्रथमच कल्याणमध्ये हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात तटकरे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. ते पुढे म्हणाले, बहुजनांच्या हितासाठी हा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी देशाची प्रगती झाली आहे ती लक्षात घेता आणि बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हा निर्णय घेतला. आज जो भव्य मेळावा घेऊन राज्यातील जनता अजितदादा यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे जाहीर झाले.

खोटारडी पीचएडी कुणाला द्यायची असेल तर ती म्हणजे टिव्हीवर वेडेवाकडे तोंड करणारे कोण हे जनतेला माहीत आहे मला त्याचे नाव घ्यायचे नाही असेही सुनिल तटकरे यांनी नाव न घेता समाचार घेतला. या मेळाव्यात आमदार दौलत दरोडा, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींनी आपले विचार मांडले. यावेळी अनेक पक्षातील पदाधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंनीच पवारांच घर फोडलं; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका

follow us