संदिपान भुमरे यांना झटका: उद्धव ठाकरे यांनी शोधला नवा पर्याय

Uddhav Thackeray vs Sandipan Bhumre : पैठण विधानसभा मतदारसंघात (Paithan Assembly Constituency) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 2019 ला मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांची आज ठाकरे गटात घरवापसी झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर संदिपान भुमरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत […]

Uddhav Thackeray Vs Sandipan Bhumre

Uddhav Thackeray Vs Sandipan Bhumre

Uddhav Thackeray vs Sandipan Bhumre : पैठण विधानसभा मतदारसंघात (Paithan Assembly Constituency) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 2019 ला मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांची आज ठाकरे गटात घरवापसी झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर संदिपान भुमरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान तयार होणार आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने गोर्डे यांनी पुन्हा शिवबंधन बांधले आहे. दत्ता गोर्डे तसेही माजी शिवसैनिक होते, मात्र भुमरे यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी आधी भाजप, नंतर राष्ट्रवादी आणि आता शिवसेना ठाकरे गटात ‘घरवापसी’ केली आहे. शिवसेनेत असताना दत्ता गोर्डे हे पैठण नगरपरिषदेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष राहिले आहेत. आज मातोश्रीवर दत्ता गोर्डे यांचा पक्षप्रवेश झाला आहे. यामुळे पैठणमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी मातोश्रीबाहेर हजारो कार्यकर्ते जमले होते. यासाठी मातोश्रीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

‘उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी’; धनंजय मुंडेंचा घणाघात

पक्ष प्रवेशापूर्वी दत्ता गोर्डे म्हणाले, शिवसेना पक्षातूनच माझं राजकारण सुरु झालं होतं. बारा वर्षे मी शिवसेनेत वेगवेगळ्या पदावर काम केलं आहे. 2019 ला संदिपान भुमरे यांच्याविरोधात निवडणूक लढलो होतो. उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या बारा दिवसांत 70 हजार मतं घेतली होती. फक्त 10 ते 12 हजार मतांनी पराभव झाला होता. आता भुमरेंना धोबीपछाड देण्यासाठी मी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहे.

‘उद्धव ठाकरेंचे सहकारी मोदी-शहांच्या भेटीला, पुराव्यांसह माहिती देणार’; नितेश राणेंचा इशारा

ते पुढं म्हणाले, कोणतेही कारण नसताना भुमरेंनी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. आज पक्ष प्रमुखांनी मला शिवसेनेत प्रवेश दिला. कारण मी पक्षाशी कोणतीही गद्दारी केली नाही. भुमरेंनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली. पैठणचा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यांना गाडण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांकडून भुमरेंचा 50 हजार मतांनी पराभव होईल.
Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर भुजबळांचा सल्ला; हा विचार ओबीसींच्या एकीमध्ये खंड…

Exit mobile version