‘उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी’; धनंजय मुंडेंचा घणाघात

‘उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी’; धनंजय मुंडेंचा घणाघात

Dhananjay Munde On Jitendra Awhad : उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी (Jintendra Awhad) सिद्ध केलं असल्याचा घणाघात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांना विनंतीवजा इशाराच दिल्याचं बघायला मिळालं आहे.

पियूष गोयल लोकसभा लढणार; भाजपाच्या प्लॅनिंगने मुंबईतील विद्यमान खासदारांना धडकी

धनंजय मुंडे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया व्यथित करणारी आहे. अजितदादांचा रांगडा स्वभाव जितेंद्र आव्हाड यांना माहिती आहे. दादांनी वेगळा विचाराचा मार्ग का पत्करला. उरलेली आता राष्ट्रवादी नाहीतर कष्टीवादी उरलेली असल्याचं आव्हाडांच्या विधानावरुन सिद्ध झालं असल्याचं मुंडे म्हणाले आहेत. शरद पवार हे जर हुकूमशहा आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहचविलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढविण्याची भाषा का करता, असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला होता. हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढून दाखवा, असं खुलं आव्हानच आव्हाडांनी अजित पवार गटाला दिलं होतं.

Ahmednagar News : भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते, मराठा समाज आक्रमक

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, अजितदादा आजही पवार कुटुंबाचे सदस्य आहेत. ते सदस्य नाहीत असं कोणीही म्हणलेलं नाही. कुणाच्या मरणाचा ते दुरान्वयेही विचार करीत नाही. वैऱ्याच्या बाबतही असा विचार अजितदादांच्या मनाला शिऊ शकत नाही. राजकारणात हीन पातळीवर जाऊन दादा राजकारण करतील याची शक्यता नाही. दादांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन एक सहानूभूतीचा एक भावनिक काळ काढण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत. जे दादा बोलले नाहीत तरीही विपर्यास सुरु असून
आव्हाडांच्या डोक्यातचा तसा हीन विचार सुरु असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही पक्षाचं वाटोळ केलं आहे, इतिहास काढला तर सगळं समोर येईल. डावखरेंपासून ते गणेश नाईकांपर्यंत तुम्ही पक्षाची कशी वाट लावली ते पवारांनाही माहित आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला काहीतरी मिळवायंच आणि पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. जर असे गलिच्छ आरोप करताल तर त्याला अशा पद्धतीने उत्तर देता येतील पवारसाहेब काल आज उद्या आमच्यासाठी दैवतच आहेत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे बंद करा , या शब्दांत धनंजय मुंडे यांनी इशाराच दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube