Download App

दूध भेसळखोरांनो सावधान! राज्यात लवकरच नवा कायदा; मंत्री सावेंनी नेमकं काय सांगितलं?

राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली.

Maharashtra News : राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी दिली. मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास विभागाच्या 150 दिवसांच्या आराखड्याच्या (Maharashtra News) अनुषंगाने मंत्रालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

या बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी अनेक सूचना केल्या. यामध्ये राज्यात दुधाला समान दर, एक राज्य एक ब्रँड, एक जिल्हा एक दूध संघ तसेच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी प्रतिनिधींनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मुंबईतील आरे स्टॉलचे आधुनिकीकरण करण्यात येईल. दूध संकलनासाठी शेतकरी प्रोड्युसर कंपन्याची मदत घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महानंदाद्वारे जास्तीत जास्त दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मंत्री अतुल सावे यांनी या बैठकीत केल्या.

दूध भेसळखोरांनो सावधान! राज्य सरकार मकोका लावणार? अजित पवारांनी काय सांगितलं..

दरम्यान, याआधी मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी दूध आणि तत्सम अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असे सांगितले होते. यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. यानंतर आता दूग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी थेट नवा कायदा आणण्याचीच घोषणा केली आहे.

दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीने प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावी, पनीरमध्ये ॲनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावावी अशा सूचना विक्रेत्यांना द्याव्यात. दूध भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, भेसळी संदर्भात जनतेला तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक योग्य प्रकारे कार्यान्वित करावा, पोर्टल विकसित करावे अशाही सूचना अजित पवार यांनी या बैठकीत दिल्या होत्या.

दूध भेसळखोरी कराल तर थेट फौजदारी कारवाई; मंत्री विखेंचे निर्देश

follow us