Download App

Rajan Vichare : ठाण्यात शिवसेनेला कोणी धक्काही लावू शकत नाही…

ठाणे : कोण्या एकाच्या सांगण्यावरुन शिवसेनेला कोणी धक्काही लावू शकत नसल्याचा विश्वास ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. खासदार राजन विचार आज ठाण्यातील शिवगर्जना मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.

राजन विचारे म्हणाले, मागील काही दिवसांपासून ठाण्यात आता शिवसेना कोण सांभाळणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेची पहिली सत्ता ठाण्यात आली होती. ठाण्यातील सर्व नेत्यांच्या संघर्षामुळे आणि त्यागामुळेच ही शिवसेना ठाण्यात निर्माण झाली.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 10.45 टक्के मतदान

त्यामुळे कोण्या एकाच्या सांगण्यावरुन शिवसेनेला धक्का लावू शकत नसल्याचा इशारा राजन विचारे यांनी शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या प्रवासाचा किस्सा रंगवून सांगितला आहे.

Women’s T20 WC: ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आज अंतिम लढत, आफ्रिकेला प्रथमच चॅम्पियन बनण्याची संधी

विचारे म्हणाले, 1989 साली ठाणे महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत प्रकाश परांजपे उभे होते. त्यावेळी शिवसेनेच्या तीन लोकांनी गद्दारी केली होती. तेव्ही दिघे साहेबांनी सांगितलं होतं, की गद्दाराला क्षमा नाही, मात्र, सध्या झालेली घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

West Bengal : केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांवर हल्ला, भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये तणाव

त्यावेळी शिवसैनिकांनी शिवसेनेची धुरा कायम ठेवली होती. मात्र यांनी तर स्वत:च्या स्वार्थासाठी ही संघटना विकायला काढली आहे. तेव्हाही काही लोकांनी गद्दारी केली होती. दिघे साहेबांनंतर रघुनाथ मोरेंच्या हाती जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे होती. तेव्हा दिघे साहेबांना आदरांजली म्हणून शिवसेनेच्या हाती एकहाती सत्ता आली होती. हा किस्सा खासदार राजन विचारे सांगण्यास विसरले नाहीत.

मुस्लिम मतं कुणाला हवीय ? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीला सुनावलं 

या शिवगर्जना मेळव्यात, उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, खासदार राजन विचार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक प्रकारे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ठाण्यात पुन्हा एकदा मोट बांधण्याचं काम सुरु असल्याचं दिसून येतं आहे.

Tags

follow us