Women’s T20 WC: ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आज अंतिम लढत, आफ्रिकेला प्रथमच चॅम्पियन बनण्याची संधी
केपटाऊन : ICC महिला T20 विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ प्रथमच T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा अंतिम फेरीचे पोहचला आहे.
या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेची नजर प्रथमच विश्वविजेते होण्याकडे असेल. यासोबतच कांगारू संघ सहाव्यांदा तसेच सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकवण्याच्या प्रेयत्नात असेल.
विश्वचषकात ऑस्ट्रेलिया अजिंक्य आहे
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत अजिंक्य आहे. यादरम्यान कांगारू संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सर्व संघांना पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 97 धावांनी, बांगलादेशचा 8 गडी राखून, श्रीलंकेचा 10 विकेट्सने आणि दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट राखून पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारून आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. तर उपांत्य फेरीत त्यांनी भारताचा 5 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
Kasba : पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह
दक्षिण आफ्रिकेची कामगिरी सरासरी
महिला विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कामगिरी सरासरीची होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यांच्या चार सामन्यांपैकी 2 जिंकले आणि 2 गमावले. चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर त्यांना उपांत्य फेरीत मिळाला. दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड आणि बांगलादेशचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, 24 फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: एलिसा हिली, बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ऍशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शट, डी’आर्सी ब्राउन.
दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड, ताजमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सुने लुस (कर्णधार), अनेके बॉश, सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा