Download App

शरद पवार, ठाकरे, पटोले आता का नाही बोलत ? प्रकाश शेंडगेंचा रोखठोक सवाल

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Obc leader Prakash Shendge on maratha reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आंदोलन मागे घेतले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यावरून आता ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी लेट्सअपशी संवाद साधताना सत्ताधारांबरोबर विरोधकांवर निशाणा साधलाय.

ओबीसीच्या
आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. ते वेगळे आरक्षण असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत होते. देवेंद्र फडणवीस हे तर ओबीसी आमच्या डीएनएमध्ये आहे, असे सांगत होते. आता ते शांत कसे झाले आहेत. सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे. ओबीसी आरक्षणाचे तीन-तेरा झाले आहेत. आता शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, उद्धव ठाकरे आता का नाही बोलत, असा सवालही शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

Australian Open 2024 : रोहन बोपन्नाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या वर्षी ठरला ग्रँड स्लॅम चॅम्पियन

जुन्या नोंदीवरून 57 लाख ओबीसी प्रमाणपत्र देण्याचे सरकारने मान्य केले आहेत. आधी 54 लाख दाखले दिले होते. आता तीन लाख आणखी दाखले देण्यात येत आहे. त्यावरून आता सगा-सोयऱ्यांना दाखले दिले जाणार नाही. अधिसूचना हा केवळ मसुदा आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठविणार आहे. त्याविरोधात ओबीसी समाज हरकती नोंदवले. न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे मनसुबेही शेंडगे यांनी जाहीर केले आहेत.

ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही; फडणवीसांची रोखठोक भूमिका

मराठा समाजाने पहिल्यांदा गुलालाची उधळण केलेली नाही. यापूर्वी आरक्षणावरून साखर वाटली आहे. ढोल बडवले आहे. ओबीसीतील आरक्षणाएेवजी मराठा समाजाने हक्काचे ईडब्लूएसचे आरक्षण घ्यायला हवे आहे. एकदा कुणबी दाखले घेतल्यानंतर ते परत ईडब्लूएसचे आरक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला फटका बसणार आहे, असे शेंडगे म्हणाले.

राजकीय पर्याय शोधावे लागणार-शेंडगे

याविरोधात आम्ही आता राजकीय पर्याय शोधणार नाहीत. ओबीसींचा पक्ष काढण्याची वेळ आली तर काढू. या सरकारला 2024 च्या निवडणुकीत आम्ही ओबीसींचा ताकद दाखवून देऊ, असा इशाराही शेंडगे यांनी दिलाय.

follow us

वेब स्टोरीज