Download App

वडेट्टीवार अन् पटोलेंचे पुन्हा दक्षिण-उत्तर! ओबीसी प्रश्नावरुन दोघांच्या दोन स्वतंत्र बैठका

मुंबई : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोघांमध्ये काँग्रेस नेतृत्वासाठी रस्सीखेच होत आहे का? असा सवाल आता पुन्हा एकदा विचारला जात आहे. दोघांनी एकाच कारणासाठी घेतलेल्या दोन वेगळ्या ठिकाणी घेतलेल्या दोन वेगवेगळ्या बैठका हे या सवालामागील प्रमुख कारण ठरले आहे. (Opposition leader Vijay Wadettiwar and Congress state president Nana Patole held two separate meetings on the OBC issue.)

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विराट सभेनंतर वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केलं आहे. तर मुंबईमध्ये नाना पटोलेंनी सुद्धा ओबीसी सेलच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या विदर्भातल्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये सारं काही अलबेला नाही याबद्दल मागील अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा होत आहे.त्यातच आता या दोन स्वतंत्र बैठका या चर्चांना खतपाणी घालताना दिसत आहेत.

कंत्राटी भरतीमुळे कायदा-सुव्यवस्था कशी राहील ? शरद पवारांचा सरकारला सवाल

ओबीसी समजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर आणि सध्या जो मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे, त्यावर कशापद्धतीने तोडगा काढता येईल, ओबीसी नेत्यांचा नेमकं काय म्हणणं आहे? मतदारसंघात जाताना मतदारांसमोर नेमकी काय भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाला गेले पाहिजे, या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जर दोन्ही बैठकांचा उद्देश समान असेल तर दोन स्वतंत्र बैठका का? असा सवाल काँग्रेसचे पदाधिकारी विचारताना दिसत आहेत.

भाजपसोबत जाण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून शरद पवारांच्या दारात बसायचे…

यापूर्वी लोकसभा मतदारसंघांच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक होणार होती. त्याकरिताच्या समन्वय समितीमध्ये नेमकी कोणाची नाव द्यायची यावरून सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा ओबीसींच्या प्रश्नावरील दोन वेगवेगळ्या ठिकाणी, दोन वेगवेगळ्या बैठकांमुळे काँग्रेस पक्षामध्ये एक वाक्यता नाही का की या दोन्ही नेत्यांमध्ये सारं काही अलबेल नाही का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.

follow us