Download App

रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द

Phone Tapping Case : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याबाबत मोठी बातमी आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेले दोन्ही एफआयआर हायकोर्टाने रद्द केले आहेत. त्यामुळे शुक्ला यांना सरकारने क्लिनचीट दिली आहे. यामुळे शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाच्या काळात गुप्तचर विभागाचे फोन टॅपिंग प्रकरण (Phone Tapping Case) उजेडात आले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी राज्य सरकार आणि फडणवीसांवर घणाघाती टीका केली होती.

Maratha Reservation : आंदोलनाचे यश नजरेच्या टप्प्यात; आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस गृहमंत्री असतान विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड(Phone Tapping Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभागप्रमुख या नात्यानं रश्मी शुक्ला यांच्यावर दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते. यापैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरा एफआयआय मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना हे दोन्ही एफआयआर दाखल करण्यात आले होते.

‘या’ नेत्यांचे फोन झाले होते टॅप

या फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस नेते नाना पटोले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरत राज्य सरकारची चांगलीच कोंडी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या प्रकरणात दोन एफआयआर रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आल्या होत्या.

धक्कादायक! RTE द्वारे प्रवेश घेतला म्हणून मुख्याध्यापिकेने दिला विद्यार्थ्याला त्रास

Tags

follow us