Download App

नवाब मलिकांच्या जामिनाला तपास यंत्रणांचाही पाठिंबा; पृथ्वीराज चव्हाण यांना वेगळाच संशय

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनामागे राजकारण असू शकते. कारण ईडी, सीबीआय, एनआयए किंवा अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने त्यांच्या जामिनाला विरोध केलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट बरीच सूचक असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मलिक यांच्या जामिनावर संशय व्यक्त केला आहे. मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. (Politics may be behind former minister and NCP leader Nawab Malik’s bail, said Prithviraj Chavan)

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नवाब मलिक यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली होती. त्यांना नुकताच जामीन मिळाला आहे. ते बाहेर आल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाबरोबर जातील, हे ते जाहीर करतील. सध्या त्यांची प्रकृती खराब आहे. मात्र, त्यांना जामीन मिळण्यामागे राजकारण असावे, अशी शंका आहे. मलिकांवर दबाव आणून राजकीय भूमिका घ्यायला भाग पाडले असावे. कारण त्यांच्या जामिनाला ईडी, सीबीआय, एनआयए किंवा अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने विरोध केलेला नाही. त्यांनी विरोध न करणे हे बरेच काही सूचक आहे, असाही संशय त्यांनी व्यक्त केला.

मोठी बातमी! नवाब मलिक यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामिन :

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते. राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अशी नवाब मलिक यांची ओळख आहे. मलिक हे 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कारागृहातून बाहेर येणारे नवाब मलिक कोणत्या पवारांची साथ देणार?

नवाब काय आहेत आरोप?

ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तांच्या खरेदीत पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराच्या आरोपावरून ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे. या दरम्यान त्यांच्यावर आरोग्याच्या कारणास्तव उपचार सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी अनेकदा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळण्यात आला होता.

Tags

follow us