मोठी बातमी! नवाब मलिक यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Nawab Malik Grants Bail : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते. राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अशी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा ओळख आहे. मलिक हे 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. (NCP Nawab Malik Grants Bail from Supreme court for health reasons )
#BREAKING Supreme Court grants bail to former Maharashtra Minister Nawab Malik on medical grounds in money laundering case for two months.
ED did not object to grant of bail on medical grounds. Malik has been behind bars since his arrest in February 2022.#SupremeCourt pic.twitter.com/FldDhaxO84
— Live Law (@LiveLawIndia) August 11, 2023
‘…तर आम्ही सोडणार नाही’; रोहित पवारांनी राम शिंदेंना दम भरला
काय आहे प्रकरण?
ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तांच्या खरेदीत पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराच्या आरोपावरून ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिकला अटक करण्यात आलेली आहे.
या दरम्यान त्यांच्यावर आरोग्याच्या कारणास्तव उपचार सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी अनेकदा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळण्यात आला होता. तर न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात आता त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.