कारागृहातून बाहेर येणारे नवाब मलिक कोणत्या पवारांची साथ देणार?

  • Written By: Published:
कारागृहातून बाहेर येणारे नवाब मलिक कोणत्या पवारांची साथ देणार?

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) :

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आता मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गट सरसावले आहेत. मलिक यांच्या जामीनाचा दोन्ही गटाच्या नेत्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. तब्बल दोन वर्षांनी माजी मंत्री नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. ईडीने जामिन नाकारल्याने मलिक सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना दिलासा दिला. त्यामुळे येत्या काही दिवसांत मलिक हे कारागृह बाहेर येतील. (nawab-malik-on-bail-which-pawar-group-he-support)

अधिकारी समीर वानखेडेंसोबत नार्कोटिक्स विभाग, सीबीआय, भाजप आणि ईडी या सर्वांसोबत एकाच वेळी नवाब मलिक यांनी संघर्ष करावा लागला. 20 वर्षापूर्वींच्या एका जमिन व्यवहारांत त्यांना ईडीने अटक केली. दोन वर्षांत मलिक यांना वैद्यकीय जामिनही मिळाला नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. मलिक यांच्या निकालाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवार समर्थकांनी ढोल-ताशे आणि फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले.

‘इंडिया’ नावाच्या वापराविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी अजित पवार समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. अनिल देशमुखानंतर नवाब मलिक यांना अटक झाली होती. तर हसन मुश्रीफ यांच्यावर टांगती तलवार होती. त्यावेळी अनेक नेत्यांनी मलिक यांच्या विषयावर बोलणे टाळले होते. मात्र सुप्रिया सुळे यांनी थेट कारागृहात जात नवाब मलिक यांची भेट घेतली होती. मलिक यांच्या कुटुंबीयांनी देखील अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी कायम संपर्क ठेवला होता.

राहुल गांधी यांची हुजरेगिरी करण्यासाठी संजय राऊत हाजीर; संजय शिरसाट यांची बोचरी टीका

विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे कारागृहात असल्याने त्यांचा मतदानाचा हक्क नाकाराला होता. त्याचा फायदा भाजपला झाला. विधानपरिषद आणि राज्यसभेत एक-एक अतिरिक्त जागा निवडून आली होती.

नवाब मलिक यांचा मुंबईतला समर्थक वर्ग, दलित-मुस्लिम बांधणी, अभ्यास आणि वकृत्व संघर्ष करण्याची ताकद सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मलिक हे अजितदादा आणि शरद पवार या दोघांनाही हवे आहेत.

नवाब मलिक हे शरद पवार गटात राहिल्यास भाजप आणि अजित पवार गटाला पुन्हा डोकेदुखी ठरू शकतात. हे लक्षात घेतल तर ते अजित पवार गटात पर्यायाने भाजपसोबत सत्तेत यावेत यासाठी मोठा दब्बाव असेल. ज्यांच्यासोबत संघर्ष केला. त्या भाजपसोबत मलिक जाणार का हा देखील प्रश्न आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हेही सत्तेत गेले आहेत. या परिस्थितीत नवाब मलिक संघर्ष करतात की भुजबळ-मुश्रीफ यांचा मार्ग पत्करतात हेही काही दिवसात समोर येईलच.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube