Download App

आम्हीही देशाचे नागरिक! देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

भिवंडी लोकसभेसाठी वेश्या व्यावसायीक महिलांनी प्रथमच मतदान केलं. तसंच, आम्हीही देशाचे नागरिक आहोत असंही त्या म्हणाल्या.

Image Credit: letsupp

Prostitute Professional women voted  : राज्यात आज लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. (Prostitute) यामध्ये मुंबईसह भिवंडी, कल्याण नाशिक येथेही मतदान झालं. दरम्यान, आज भिवंडी शहरातील “रेड लाइट एरिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान टेकडी परिसरातील देह विक्री करणाऱ्या महिलांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी हा हक्क प्रथमच बजावला आहे.

 

महिलांनी प्रथमच बजावला हक्क

देशभरात लोकसभेच मतदान म्हणजे लोकशाहीच्या उत्सवाची रणधुमाळीचं म्हणावी लागेल. सध्या देशात हा उद्सव चांगलाच रंगला आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून देशाचं नेतृत्व निवडण्याची संधी आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला मतदानानं दिले आहेत. या मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी प्रशासन सर्व स्तरावर कायम प्रयत्न करत असतं. आज भिवंडीच्या एका मतदान केंद्रावर देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. भिवंडी शहरातील हनुमान टेकडी परिसरातील महिलांनी आपला हक्क बजावला. यावेळी त्यांनी आम्हीही या देशाचे नागरिक असून आज लोकशाहीचा एक भाग झाल्याचं समाधान आहे अशी भावना व्यक्त केली.

 

नोंदणी शिबीर राबवल

हनुमान टेकडी हा परिसर भिवंडी शहरातील रेड लाइट एरिया म्हणून ओळखला जातो. येथे देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीत साई सेवा संस्थेच्या माध्यमातून मतदार नाव नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या नोंदणीनंतर या महिलांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम देखील राबवण्यात आला होता. त्यानंतर आज या वस्तीतील असंख्य महिलांनी साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती सिंह यांच्या नेतृत्वाखाली खदान रोड येथील जे. जे गुप्ता हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

 

आम्हाला सुध्दा मतदानाचा हक्क

आजपर्यंत अनेकदा हा विषय न्यायालयातही गेला आहे. या लोकांना अधिकार आहेत की नाही. किंवा यांच्यापासून देशातील अनेक अशा बाबी आहेत त्या कायम दूर राहिल्या आहेत. मात्र, त्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावल्याने त्यांना एक वेगळा आनंद झाल्याचं दिसलं. याबाबद बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही महिलाही या देशाच्या नागरीक असून आम्हाला सुध्दा मतदानाचा हक्क असल्याने आम्ही तो प्रथमच बजावत आहोत. मात्र, आमच्याकडे देखील शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी देह विक्री करणाऱ्या महिलांनी आज बोलून दाखवली.

follow us

वेब स्टोरीज