पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीचं नेमकं काय चुकलं?

पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीचं नेमकं काय चुकलं?

Pune Crime : पुण्यात (Pune)एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर मानलं जातं. पण याच पुण्यामध्ये काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता अतिशय धक्कादायक घटना घडलीय. पुण्यात एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीला आरोपींनी डांबून वारंवार अत्याचार केला आहे. त्या मुलीकडून वेश्या व्यवसाय (Prostitute business)करुन घेतला आहे. त्या मुलीच्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेल्या अवघ्या 30 हजार रुपयांसाठी आरोपींनी हा किळसवाणा प्रकार केला आहे. या प्रकरणामध्ये या निष्पाप मुलीचं नेमकं काय चुकलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘मूळ राष्ट्रवादीचे ‘दादा’ अजित पवारच’; विधानसभा अध्यक्षांचा शरद पवार गटाला दणका

घडलं असं की, पुण्यात एका 17 वर्षीय तरुणीला बांधून गेल्या 15 दिवसांपासून डांबून तीच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणीच्या वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्यामुळे आरोपींनी त्या तरुणीवरच अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी सदर तरुणीला एका लॉजमध्ये डांबून 15 दिवस तीच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होता.

राज्यसभेतही दिसले भाजपचे धक्कातंत्र : सात मंत्र्यांसह दिग्गजांना डावललं… तब्बल 24 नवख्यांना उमेदवारी!

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पूनम माने (वय 22) आणि आकाश माने (वय 24) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. तसेच पूनम माने हिला पोलिसांनी अटक केली आहे. तर तिचा नवरा आकाश हा फरार झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील आजारी असताना संबंधित दाम्पत्याकडून उपचारासाठी 30 हजार रुपये घेतले होते. काही कारणास्तव त्यांना ते पैसे देण्यास अडचण येत होती. पैसे देणे जमले नाही. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या मुलीला एका लॉजवर नेऊन तब्बल 15 दिवस डांबून ठेवलं. आणि सदर तरुणीवर आरोपी आकाश माने याने वारंवार अत्याचार केला. आरोपींचं एवढ्यावरच समाधान झालं नाही. त्यांनी सदर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं शरीर विक्रीला भाग पाडलं. संबंधीत तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन आरोपी दाम्पत्याने पैसे कमवले आहेत.

ही घटना समोर आल्यानंतर समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या आरोपी दाम्पत्याने या तरुणीला एका लॉजवर डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीची सुटका केली. त्यानंतर आता तरुणीला ज्या लॉजमध्ये डांबून ठेवले होते, त्या लॉज मालकाची चौकशी पोलीस करणार आहेत. या प्रकरणी पोलिसांना आकाशची पत्नी पूनम हीला अटक करण्यात आली आहे तर आकाश फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube