‘मूळ राष्ट्रवादीचे ‘दादा’ अजित पवारच’; विधानसभा अध्यक्षांचा शरद पवार गटाला दणका
NCP Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. या निकालामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दादा’ अजित पवारचं असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. म्हणजेच दहाव्या परिशिष्टानूसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलायं. त्यामुळे आता खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच आणि पक्षाचं चिन्ह घड्याळ अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल देताना अजित पवार गटाचा एकही आमदार अपात्र ठरवलेला नाही.
पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस
राज्य विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र आमदार प्रकरणाच्या निकालाच वाचन करीत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून राज्याच्या विधीमंडळात ही सुनावणी सुरु होती. याआधी शिवसेना पक्षाचीही सुनावणी पार पडली. काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला. शिवेसेनेचा आणि राष्ट्रवादीचा निकालामध्ये साम्य असल्याचं दिसून येत आहे. कारण मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून ठाकरे आणि शिंदे गटातील एकाही आमदाराला राहुल नार्वेकरांनी अपात्र ठरवलं नव्हत. आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणातही नार्वेकरांनी मूळ राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असल्याचा निर्णय दिला असून अजित पवार गटाचे सर्वच आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत.
Lok Sabha Election : ‘ओबीसी बहुजन पार्टी’ही लोकसभेच्या रिंगणात; सर्व मतदारसंघात देणार उमेदवार
निकालामध्ये राहुल नार्वेकरांनी पक्ष कोणाचा हे ठरवताना पक्षाच्या घटनेचा किंवा पक्षाच्या नेतृत्वाचाही विचार केलेल नाही. याउलट विधानसभा अध्यक्षांकडून शरद पवार गटासाठी काही निरीक्षणे नोंदवली गेली. शरद पवार गटाने दहाव्या परिशिष्टाचा गैरवापर करु नये, शरद पवार गटाने आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नये,स पक्षांतर्गत मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही, पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधीमंडळ पक्षाची नाराजी नाही, असं विधानसभा अध्यक्षांनी निरीक्षण नोंदवलं आहे. यासोबतच
दहावे परिशिष्ट म्हणजे पक्ष चालवण्याचं शस्त्र नाही. पक्षात लोकशाही असेल याची दक्षता घेतली पाहिजे, दहाव्या सूचीचा वापर आमदारांना शिक्षा करण्यासाठी करु नये, असंही राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी मागील जुलै महिन्यात वेगळा निर्णय घेत राज्य सरकारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात आमदार अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या. या याचिकांवर राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. साक्षी, नोंदी आणि उलटतपासणी घेण्यात आली. या निकालाआधी निवडणूक आयोगाचा निकाल आला. आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिले. यानंतर शरद पवार गटाला पक्षासाठी दुसरे नाव घ्यावे लागले. आता चिन्हही लवकरच मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज नार्वेकर यांनी अपात्रता प्रकरणी निकाल दिला आहे.