Download App

पेपरफुटीविरोधातील आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

Vijay Vadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी पेपरफुटीचे (Talathi Bharti Exam) प्रकरण गाजत आहेत. याविरोधात राज्यभरातील परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार बोलत होते.

पेपरफुटी झाल्यामुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रीया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तलाठी पद भरती प्रक्रीया रद्द करावी. या संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शिंदे गटाच्या अपात्रता याचिकेवर उच्च न्यायालयाचा ठाकरे गटासह नार्वेकरांना धक्का…

वडेट्टीवार म्हणाले की, तलाठी पद भरती रद्द करण्यासाठी परीक्षार्थींच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. यासंदर्भात पुण्यात 23 जानेवारीला परीक्षार्थींशी संवाद साधणार आहे. त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. घोटाळेबाजांवर कारवाई करण्याऐवजी सरकार विद्यार्थ्यांवर कारवाई करत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या, भाजपचा हल्लाबोल

आंदोलन चिरडण्याची या सरकारची जुलमी वृत्ती आता लपून राहिलेली नाही. या मुलांनी कायदा हातात घेतला नाही. न्याय मिळण्यासाठी आंदोलन केले. परंतु आमच्या घोटाळ्याविरोधात बोलाल तर गुन्हे दाखल करू, अशी सरकारची दडपशाहीची भूमिका आहे. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये टीसीएसचेच कर्मचारी सहभागी आहेत. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत. यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकते, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

follow us