Download App

Raj Thackeray : राज ठाकरेंचा आदेश! ‘त्या’ वादात पडू नका; निवडणुकीची तयारी सुरू करा

Raj Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असून या वादात पक्षाच्या नेत्यांनी पडू नयेत अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. आरक्षणाबाबत काही दिवसात भूमिका स्पष्ट करू, असेही राज ठाकरे म्हणाले.

दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. मराठी पाट्यांसाठी न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तेव्हा ज्या दुकानदारांनी अद्याप मराठी भाषेत पाट्या लावल्या नसतील त्यांना आठवण करुन द्या, असे राज ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुका आधी होतील त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होतील. तेव्हा आता निवडणुकांच्या तयारीला लागा. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद सुरू आहे. त्यात पडू नका अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Maratha Reservation: आंदोलनामागे कोण हे शोधून काढावे; मनोज जरांगेंचे राज ठाकरेंना थेट चॅलेंज

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा खास प्लॅन 

आगामी निवडणुकांसाठी मनसेने बैठकांचा धडाका लावला आहे. या आगामी लोकसभा निवडणुकीवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाष्य केले आहे. आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात वॉर रुम उभारणार आहोत. या निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. लोकसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात चर्चा झाल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर शंका उपस्थित केल्या होत्या. मुळात या प्रकारचे कोणतेही आरक्षण कधीही मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर सांगून आलो होतो. मी कोणतीही नवीन गोष्ट सांगत नाही. आता हे जरांगे पाटील आहेत की त्यांच्या मागून कुणीतरी बोलत आहे, ज्याच्यातून जातीयवादाच्या माध्यमातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी सुरू होत आहेत. हे काही मला इतके सरळ चित्र दिसत नाही. पण कालातंराने कळेल की यामागे कोण आहे? असे म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनातून राजकारण करण्यात येत असल्याचा आणि जातीय वाद भडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.

Raj Thackeray : ‘त्या’ 44 टोलनाक्यांचं काय होणार? राज ठाकरेंनी दिली बैठकीतील खडा न् खडा माहिती

Tags

follow us