Download App

Raj Thackeray : …तेव्हा बांधकामासाठी टेंडर नव्हते; बाबरीची वीट मिळाल्यानंतर राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशिदीची (Babari mosque) एक वीट भेट म्हणून दिली. ही वीट मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मिश्किल प्रतिक्रियेने उपस्थितांमध्ये हशा पिकवला. राज ठाकरे म्हणाले की, ‘ही वीट मजबूत आहे कारण त्यावेळी बांधकामासाठी टेंडर निघत नव्हते.’

संदिपान भुमरे यांना झटका: उद्धव ठाकरे यांनी शोधला नवा पर्याय

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाळा नांदगावकर यांनीही वीट सहा डिसेंबरला बाबरीचा ढाचा पाडला. त्यावेळी आणली होती. त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते. त्यात बाळा नांदगावकर हे देखील होते. ढाचा पाडल्यानंतर तिथे ज्या विटा होत्या. त्यातल्या या दोन विटा नांदगावकर घेऊन आले होते.

‘उद्धव ठाकरेंचे सहकारी मोदी-शहांच्या भेटीला, पुराव्यांसह माहिती देणार’; नितेश राणेंचा इशारा

त्यातील एक वीट त्यांच्याकडे आहे आणि दुसरी भेट त्यांनी मला भेट म्हणून दिली. या विटेचे वजन बघा त्यावेळेस बांधकाम खूप चांगला दर्जाचं होतं. कारण त्यावेळी कन्स्ट्रक्शनसाठी टेंडर्स निघत नव्हते. तसेच ही वीट म्हणजे ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. त्यामुळे आता मला अशीच एक राम मंदिराची वीट हवी आहे. कारण राम मंदिराचे बांधकाम सुद्धा अजून सुरू आहे. ती वीट देखील मी मिळवेल. असं राज ठाकरे म्हणाले.

‘उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी’; धनंजय मुंडेंचा घणाघात

तसेच यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले की, तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायच्या. 32 वर्षे झाली. राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. 22 जानेवारी रोजी मंदिर लोकांसाठी खुले झालं आणि 23 तारखेला बाळासाहेबांचं जन्म दिवस आहे. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही पण, मी आणली. मी माजगाव मध्ये कार्यालय बांधलं तेव्हा त्या कर्यालयाखाली वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधव कडे आहे. असो हरकत नाही. ते माझा जुना सहकारी आहेत.

follow us