उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी मोदींचे चहापान, कोण आहे पंतप्रधानांना चहा देणारी महिला

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी मोदींचे चहापान, कोण आहे पंतप्रधानांना चहा देणारी महिला

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यासोबतच पीएम मोदींनी अयोध्येत दलित महिला मीरा मांझी यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी बनवलेला चहा घेतला.

मीरा मांझी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराच्या घरी काही वेळ थांबले. यादरम्यान त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली आणि चहा घेतला.

8 किलोमीटर लांबीचा रोड शो
याआधी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत 8 किलोमीटर लांबीचा रोड शो केला. यानंतर अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचल्यानंतर विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधानांचा रोड शो झाला. यावेळी नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी होती.

Manipur Violence: हिंसेची धग कायम! आई-पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून प्रसिद्ध गायकाचं अपहरण

अयोध्या प्रकरणातील वकिलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले
बाबरी खटल्यातील वकील हाशिम अन्सारी यांचा मुलगा इक्बाल अन्सारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. यावेळी पीएम मोदींवर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करताना ते दिसून आले. इक्बाल अन्सारी म्हणाले, अयोध्या सर्वांना संदेश देते की येथे हिंदू आणि मुस्लिम सर्व एकत्र राहतात आणि एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात.

Uddhav Thackery : त्यांच्या वजनानेच बाबरी मशिदीचा ढाचा पडला असेल; ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला

विशेष म्हणजे बाबरी प्रकरणात इक्बाल अन्सारी पक्षकार होते आणि मंदिरासाठी ही जमीन देण्याला त्यांचा विरोधात होता. त्यासाठी ते न्यायालयात खटला लढत होते. 2020 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत पोहोचले होते तेव्हा त्यांनीही मोदींचे स्वागत केले होते. इक्बाल यांना राम मंदिर ट्रस्टकडूनही निमंत्रण मिळाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज