अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे रामायण’मधील लक्ष्मणाला निमंत्रण नाही; कारण काय?
Ram Mandir Inauguration: अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir ) भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यात बॉलिवूडपासून (Bollywood) छोट्या पडद्यापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ‘रामायण’ या लोकप्रिय शोमध्ये रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलला (Arun Govil) निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सीतामातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियालाही निमंत्रित करण्यात आले आहे, मात्र सुनील लाहिरी (Sunil Lahiri) यांना या कार्यक्रमात येण्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. यामुळे अभिनेता नाराज झाला आहे. सुनील लाहिरी यांनी याप्रकरणी आपली खंत व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
सुनील लाहिरी यांची प्रतिक्रिया: दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुनील लाहिरी म्हणाले की, ‘प्रत्येक वेळी तुम्हाला बोलावलेच पाहिजे असे नाही. मला बोलावले असते तर मी नक्कीच गेलो असतो. मला आमंत्रित केले असते तर बरे झाले असते. मलाही इतिहासाचा भाग बनण्याची संधी मिळाली असती, पण हरकत नाही. काळजी करण्यासारखे काही नाही.
यानंतर सुनील लाहिरी यांनी ‘रामायण’च्या निर्मात्यांनाही आमंत्रित करण्यात आले नसल्याबद्दल खंत व्यक्त केले आहेत. म्हणाले की, ‘कदाचित त्यांना वाटत असेल की लक्ष्मणचे पात्र तितकेसे महत्त्वाचे नाही किंवा त्यांना मी वैयक्तिकरित्या आवडत नाही. मी प्रेमसागरसोबत होतो, पण त्याला देखील आजिबात बोलावले नाही. मला हे विचित्र वाटते की त्यांनी रामायणाच्या कोणत्याही निर्मात्यांना आमंत्रित केले नाही.
Manipur Violence: हिंसेची धग कायम! आई-पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून प्रसिद्ध गायकाचं अपहरण
समितीचा वैयक्तिक निर्णय: ते पुढे म्हणाले, ‘कुणाला निमंत्रित करायचे की नाही, हा समितीचा वैयक्तिक निर्णय आहे. मी ऐकले की 7000 पाहुणे आणि 3000 VIP आमंत्रित आहेत. त्यामुळे मला वाटते की त्यांनी रामायण शोशी संबंधित असलेल्यांना, विशेषत: मुख्य कलाकार आणि निर्मात्यांनाही आमंत्रित करायला हवे होते. अशाप्रकारे सुनील लाहिरी यांनी स्पष्ट केले की, त्यांना राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला आमंत्रित केले असते तर ते नक्कीच गेले असते.अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.