Uddhav Thackery : त्यांच्या वजनानेच बाबरी मशिदीचा ढाचा पडला असेल; ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला

Uddhav Thackery : त्यांच्या वजनानेच बाबरी मशिदीचा ढाचा पडला असेल; ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला

Uddhav Thackery : उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बाबरी मशिदीचा ढाचा देवेंद्र फडणवीस चढले असतील आणि त्यांच्या वजनामुळे तो पडला असेल ते मला माहित नाही. मात्र लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या मुलाखतीत बाबरी मशिदीच्या प्रकरणामध्ये शिवसेना असल्याचेही म्हंटल आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा गृहपाठ कमी पडतोय.’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

नाशिक : मुक्त विद्यापीठातील राम मंदिराचा कार्यक्रम वादात : पुरोगामी विचारवंतांची सडकून टीका

आज 30 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे संजोग वाघिरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या निमंत्रणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितलं की, मला निमंत्रण मिळालेले नाही. मात्र मी आयोजित कधीही जाईन आणि रामाचे दर्शन घेईल.

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे रामायण’मधील लक्ष्मणाला निमंत्रण नाही; कारण काय?

त्याचबरोबर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, बाबरी मशिदीचा ढाच्या पाडला त्यामध्ये शिवसेनेचा कोणतेही योगदान नाही. त्यावर ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली की, बाबरी मशिदीचा ढाचा त्यावर देवेंद्र फडणवीस चढले असतील. त्यांच्या वजनामुळे तो पडला असेल ते मला माहित नाही. मात्र लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या मुलाखतीत बाबरी मशिदीच्या प्रकरणामध्ये शिवसेना असल्याचेही म्हंटल आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा गृहपाठ कमी पडतोय. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले नव्हते. यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. रामजन्मभूमी मंदिर न्यास आणि विश्व हिंदू परिषदेने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे यांनी हे निमंत्रण आपल्याला आलं नसल्याचं सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube