नाशिक : मुक्त विद्यापीठातील राम मंदिराचा कार्यक्रम वादात : पुरोगामी विचारवंतांची सडकून टीका
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरु प्रा.संजीव सोनवणे यांच्या हस्ते पार पडलेला ‘श्रीराम मंगल अक्षदा कलश’ स्वागत आणि पूजनाचा कार्यक्रम वादात सापडला आहे. विद्यापीठाच्या नाव यशवंतराव चव्हाण यांच्या नावावरुन आहे, विद्यापीठ की धर्मपीठ’ असे म्हणत या कार्यक्रमावर पुरोगामी विचारवंतांनी सडकून टीका केली आहे. (Shri Ram Mangal Akshada Kalash’ reception and worship program held in the premises of Yashwantrao Chavan Maharashtra Open University has been mired in controversy)
नेमके प्रकरण काय?
अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे निमंत्रण घेऊन अयोध्या येथून मंगल अक्षदा कलश नाशिक शहरात आणला आहे. या मंगल अक्षदा कलशाचे भव्य स्वागत आणि पूजनाचा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरु प्रा.संजीव सोनवणे यांच्या हस्ते पार पडला.
Box Collection: प्रभासच्या ‘सालार’ चा ‘डंकी’ ला फटका? नवव्या दिवशी किंग खानच्या चित्रपटाच्या कमाईत घट
काल (29 डिसेंबर) संध्याकाळी विद्यापीठाने एक परिपत्रक काढून याविषयीची माहिती दिली होती. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात व्हावा आणि कुलगुरू महोदयांच्या हस्ते व्हावा अशी विनंती अभाविपने केली होती. याशिवाय विद्यापीठातील सर्व नियमित / करारावरील शिक्षक, अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले होते.
पुरोगामी विचारवंतांची सडकून टीका :
दरम्यान, याच कार्यक्रमावर पुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, निखील वागळे, मिलिंद चव्हाण, निशा शिरुरकर यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात टीका केली.