Download App

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर आता ‘ठाकरें’चा वॉच; मनसेचे कॅमेरे ठेवणार लक्ष

Raj Thackeray : राज्यातील टोल वसुली संदर्भात मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले होते की टोलनाक्यांवर आमची माणसे उभी राहून हलक्या वाहनांना टोल भरू देणार नाहीत. जर कुणी अडवलं तर टोलनाकेच जाळून टाकू. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक टोलनाक्यावर सरकार आणि मनसेचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील अशी माहिती दिली.

राज्य सरकारने टोलनाक्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती मंत्री दादा भुसे, राज ठाकरे यांनी संयुक्तपणे दिली. पुढील 15 दिवसांत मुंबईतील एन्ट्री पॉइंट्सवर सरकारचे कॅमेरे लागतील. मनसे पक्षाचेही कॅमेरे लागतील. मंत्रालयात सेल उभा करून व्हिडिओग्राफीवर लक्ष ठेवण्यात येईल. भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचे आयटीकडून सर्वेक्षण केले जाणार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

जुना शिरस्ता कायम ठेवत अजितदादा अॅक्शन मोडमध्ये; ‘पालकमंत्री’ तब्बल 8 तास घेणार झाडाझडती

उद्यापासून सर्व टोलनाक्यांवर व्हिडिओग्राफी सुरू केली जाईल. ठाण्यात चारचाकीवर लागलेला टोलवाढ रद्द करण्यासाठी सरकारला काही वेळ हवा आहे. यलो लाइनच्या पुढे वाहनांची रांग लागली तर टोल घेता येणार नाही. लोकांना होणाऱ्या त्रासासाठी एक नंबर जारी केला जाईल या नंबरवरून प्रवाशांना तक्रार करता येईल. टोलनाक्यांवर स्वच्छतागृह आणि प्रथमोपचाराचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचे आयआयटीमार्फत सर्वे करण्यात येईल, अशी माहिती राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

‘त्या’ 44 टोलनाक्यांचं काय होणार ?

राज्यातील जुने 44 टोलनाके बंद करण्यासाठी यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. या काळात या मुद्द्यावर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आता हे टोलनाके बंद होतील अशी अपेक्षा आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. या टोलनाक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 टोलनाक्यांचा समावेश आहे.

एकनाथ खडसेंना मोठा दिलासा! भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर

9 वर्षांनंतर सह्याद्रीला गेलो

काल सह्याद्रीवर बैठक झाली. तिथे काही गोष्टी ठरल्या. टोलच्या मुद्द्यासाठी मी नऊ वर्षांनंतर सह्याद्रीला गेलो होतो. नऊ वर्षांआधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी सुद्धा काही गोष्टी ठरल्या होत्या. काही सुरू झाल्या. त्यावेळीच मला एक गोष्ट समजली होती की टोलचे करार 2026 ला संपणार आहेत. ही काही नवीन गोष्ट नव्हती. पण, काही सुधारणा होणं गरजेचं होतं. करार झाले त्यातही काही चुकीच्या गोष्टी होत्या. पण ते करार बँकेबरोबर झाले होते त्यामुळे त्यात काही करता येत नव्हते. त्यावेळी काही सुधारणा होणे गरजेचे होते पण, दुर्दैवाने तसं घडलं नाही.

Tags

follow us